सावधान! पुढचे 3 दिवस धोक्याचे, महाराष्ट्रावर हिटवेवचं संकट, IMD कडून 14 जिल्ह्यांसाठी अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात सतत हवाबदल होत असून महाराष्ट्रातील काही जिल्हे सर्वाधिक हॉटस्पॉट ठरले आहेत. तापमान 44 ते 45 डिग्रीवर पोहोचलं आहे. महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेने कहर केला आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

जळगाव, जेजुरी, मालेगाव, धाराशिव, परभणी, गडचिरोली आणि नाशिक येथे पारा 42 अंशांवर गेला. आज या भागांत उष्णतेचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उष्ण लाट येण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. साधारण १४ जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.

Maharashtra is experiencing constant weather changes, with some districts emerging as major hotspots. Temperatures have soared to around 44 to 45 degrees Celsius. The heatwave continues to grip the state, with Vidarbha and Marathwada bearing the brunt of extreme temperatures. In Chandrapur and Bramhapuri, the temperature even reached a scorching 45 degrees Celsius.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *