मुंबई : दिल्लीच्या एम्स ने सुशांतसिंग प्रकरणाचा अभ्यास करून अहवाल दिला असून त्यात सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी कोरोनाकाळात या प्रकरणावरून राज्याची बदनामी करण्याचा राजकीय कट झाल्याचा आरोप केला आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि मुंबई पोलिसांना बदनमा करणा-यांच्या बाबतीत माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.या बदनामीच्या मोहिमेत काही वाहिन्या देखील सहभागी होत्या असे देशमुख म्हणाले. एका राजकीय पक्षाने सरकारला बदनाम करण्याचा चंग बांधल्याचा आरोप त्यांनी केला.
गृहमंत्र अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना या निमत्ताने सवाल केला आहे की, बिहारचे माजी पोलीस प्रमुख गुप्तेश्वर पांडे यांनी या बदनामीत महत्वाची भुमिका बजावली त्यांच्या निवडणूक प्रचारात फड़णवीस जाणार आहेत का? पोलिस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले की, सुशांतची बहिण बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे ड्रग्ज देत होती, धक्कादायक माहिती समोर आली आहे.सुशांतच्या डॉक्टरने त्याला मानसिक समस्या असल्याचे सांगितले होते. अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून सुरु असलेला तपास अद्याप सुरु आहे.
दुसरीकडे एम्स रुग्णालयाने सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळला असून ही आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. सुशात प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास सुरु असून अनेक सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. यादरम्यान सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वाहिन्यांशी बोलताना ही माहिती दिली.
“सुशांतच्या डॉक्टरने त्याला मानसिक समस्या असल्याचे सांगितले होते. त्याला बायपोलार डिसॉर्डर होता. मार्चपासून त्याने औषध घेणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा तणाव वाढला होता,” असे परमबीर सिंग यांनी सांगितले. “आमच्याकडेही सुशांत सिंह ड्रग्ज घेत असल्याची माहिती आली होती. ड्रग्ज घेत असल्याने मृत्यू झाला का याचा तपास आम्ही करत होतो,” अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली. सुशांत प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले की, सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबविण्यात आली; त्या फेक अकाऊंट्सना आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
“सुशांत प्रकरणी एकूण ५६ जणांचा जबाब नोंदवण्यात आला होता. ५६ पैकी फक्त पाच जण चित्रपसृष्टीशी संबंधित होते,” असे त्यांनी सांगितले. “गुप्तेश्वर पांडे आयपीएस अधिकारी असून माझे वरिष्ठ आहेत. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही ठरणार नाही. हे माझ्या मनाला पटत नाही,” असे सांगत परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपांवर उत्तर देणे टाळले.
“मीडियामधील काही जण अजेंडा चालवत असून मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते. आमच्या तपासाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. सुप्रीम कोर्टाने जेव्हा आमच्याकडे तपासातील प्रगती दाखवणारा रिपोर्ट मागितला तेव्हा आम्ही तो एका बंद लिफाफ्यात सादर केला होता. हा एक गोपनीय अहवाल होता. राज्यातील पाच लोकांपेक्षा अधिक कोणीही तो रिपोर्ट पाहिला नव्हता,” अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी हा रिपोर्ट पाहिला यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासात कोणतीही चूक दिसत नसल्याचं सांगितलं. त्यांनी समाधान व्यक्त केलं”. “मुंबई पोलीस आपल्या एडीआरचा तपास करत राहील सांगताना सुप्रीम कोर्टाने बिहारचा एफआयआर सीबीआयकडे सोपवला. जर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला तो सीबीआयकडे दाखल होईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं,” अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.
“आमच्या तपासाची किंवा रिपोर्टची कोणालाही माहिती नव्हती. कोणीही तो रिपोर्ट पाहिलेला नव्हता. अनेक मोठमोठ्या वकिलांनीही चॅनेलवर जाऊन आमच्या तपासावर टीका केली. त्यांना मी आपण कोणत्या आधारे आरोप केला याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी आम्हाला चॅनेलच्या अँकरकडून माहिती मिळाली असे सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली.