मुंबई : बिहार निवडणुकीत शिवसेना ५०उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेच्या विरोधात लढणार आहे. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात शिवसेनेची बदनामी करण्यात आली. बिहारचे माजी पोलीस संचालक यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवला होता त्यामुळे निवृत्ती घेवून आमदार आणि मंत्रीपदामागे असलेल्या पांडे यांना आस्मान दाखविण्यासाठी सेना बिहारच्या मैदानात उतरणार आहे.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुप्तेश्वर पांडे यांनी सेवानिवृत्ती घेत जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पांडेंच्या महाराष्ट्र सरकारविरोधातली भूमिका केवळ आकसापोटी असल्याची शंका शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१५मध्ये शिवसेनेने ८०जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यावेळी मराठी अस्मितेचा मुद्दा घेत प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना ५० जागा लढवून टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुख्यत: महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसांवर ज्या डीजीपी पांडेनी संशय व्यक्त केला गेला होता त्याच पांडेना टक्कर देवून चित करणार असल्याचा निर्धार शिवसेना खासदार अनिल देसाईं यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान बिहार निवडणुकी प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस हे गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का ? असा प्रश्न करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल उपस्थित केला होता