मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि ती काल रात्री म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी आपल्या घरी परत आली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज एँगल पुढे आल्यानंतर रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. रिया जवळपास एक महिना मुंबई भायखळा कारागृहात होती. पण आता मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. रिया घरी आल्यानंतर तिची आई संध्या चक्रवर्ती यांनी मीडिया आणि लोकांवर राग व्यक्त केला.
माध्यमाशी बोलताना रियाच्या आईने सांगितले की या महिन्याभरात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे बर्बाद झाले. हे सांगताना त्यांनी राग आणि दुःख दोन्ही व्यक्त केले. संध्या चक्रवर्ती म्हणाल्या, “आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे की तिने तिचा मान राखून ठेवला जेव्हा की तिच्याशी कसा व्यवहार केला गेला.” जेव्हा ती घरी आली तिने आम्हाला पाहिले आणि ती म्हणाली, ‘तुम्ही इतके दु:खी का वाटत आहात? आपल्याला मजबूत होवून संघर्ष करावा लागणार आहे.’ पण आम्ही कोणाशी लढत आहोत? जनतेच्या समाधानासाठी कोणालातरी अटक करावी लागणार होती आणि त्यासाठी रियाला ती किंमत मोजावी लागली. एका अशा व्यक्तिच्या प्रेमात पडून आणि त्याची काळजी घेतली यासाठी तिला पूर्ण शहरात ओढले गेले.’
आई म्हणाली, ‘मी झोपू शकत नाही, खाऊ शकत नाही कारण माझी मुले तुरूंगात होती. मी घरी अस्वस्थ व्हायचे, मध्यरात्री उठून बसले. माझे कुटुंब उध्वस्त झाले आहे. एक वेळ असा होता जेव्हा मी आत्महत्येचा विचार करायला लागले होते. रियाला जामीन मिळाला आहे, आणि समाधानाची बाब ही आहे की उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात मान्य केले की, रियाचा संबंध ड्रग्ज सिंडिकेटशी तपासात सिद्ध होऊ शकले नाही ही दिलासा देणारी बाब आहे.