अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या हळदीच्या समारंभात दिसली खूपच सुंदर…

मुंबई :  अभिनेत्री काजल अग्रवालच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण नुकताच आला आहे. 30 ऑक्टोबरला काजल तिचा प्रियकर गौतम किचलूबरोबर कायमची बंधन बांधून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. यापूर्वी 29  ऑक्टोबर रोजी काजल मेहंदी आणि हळद समारंभात आनंदाने भारावून गेली होती. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हळदीच्या समारंभासाठी काजल या प्रसंगी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात दिसली. काजलच्या विवाहसोहळ्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्रच हजेरी लावणार आहेत. काजलच्या लग्नाची सर्व कामे तिच्या मुंबई स्थित निवासस्थानी करण्यात आली आहेत. काजलने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची आनंदाची बातमी सामायिक केली आणि ती गौतम किचलूसोबत मुंबईत सप्तपदी करणार असल्याचे सांगितले.

काजल अग्रवालचा मंगेतर गौतम किचलू इंटिरियर डिझाइनचा व्यवसायिक असून हैद्राबादमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. गौतम आणि काजल गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी दोघांची एंगेजमेंट झाली होती. काजलने 6 ऑक्टोबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की ती 30 ऑक्टोबरला गौतमसोबत लग्न करणार आहे.  कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम खासगी ठेवण्यात येईल, असे काजल म्हणाली होती.

 

Social Media