मुंबईत दिवसभरात 1 हजार 120 नवे रुग्ण; आज 33 जणांचा मृत्यू

मुंबई :  मुंबईत काल दिवसभरात नवीन १ हजार १२० रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ५५ हजार ३६२ झाली आहे. मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज १ हजार ८२४ रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या २ लाख २६ हजार ४१ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णाची संख्या १८ हजार ३६७ झाली आहे.

दुर्दैवाने आज ३३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १० हजार १८६ झाली आहे. आज मृत्यू झालेल्यात २१ पुरुष व १२
महिला होत्या. तर २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईत बरे झालेल्या रुग्णाचा दर आता ८८ टक्के इतका झाला आहे. तर २२ ओकतोबर ते २८ ओकटोबर दरम्यान कोविडवाढीचा दर हा ० .४६ टक्के इतका आहे. २८ ओकटोबर पर्यत एकूण १४ लाख ९८ हजार ५९८
कॉविड च्या चाचण्या करण्यात आल्या, तर मुंबईतील रुग्णांचा दुपटीचा दर हा १४९ दिवस इतका झाला आहे.

Social Media