मुंबई : सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आणि उद्योगपती गौतम किचलू यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. अलीकडेच काजलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, चाहत्यांना हे फोटोज खूप आवडत आहेत आणि बरेच कमेंट्स देखील देत आहेत. इतकेच नव्हे तर काजलने तिच्या लग्नाची माहिती तिच्या चाहत्यांसमवेत सांगतांनाही खुलासा केला की तिच्या लग्नात कोरोनाव्हायरस साथीच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे.
नुकताच एक सुंदर व्हिडिओही तिच्या इन्स्टाग्रम अकाऊंटवर सामायिक करण्यात आला ज्यामध्ये काजल अग्रवाल तिच्या वडिलांचा हात धरून लग्नाच्या मंडपात येताना दिसत आहे. त्यात ती पूर्णपणे वधूच्या साजश्रृंगारमध्ये दिसली आहे. सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
आता खुद्द अभिनेत्रीने लग्नाच्या मंडपातील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.त्यामध्ये तिने आपल्या पतीविषयी एक सुंदर कोटही लिहिले आहे. त्यांनी गौतम किचलूला खास मित्र आणि सोलमेट म्हणून वर्णन केले आहे.त्याच व्हिडिओमध्ये काजल वडिलांच्या हाताला धरून लग्न मंडपात आली होती. लोक त्यांचे स्वागत करत असल्याचे दिसून येत आहे.या व्हिडिओमध्ये काजल अग्रवाल खूपच आनंदी दिसत आहे. काजल अग्रवाल यात तिच्या आईला फ्लाईंग किस देत आहे.