मुंबई : करवाचौथचा सण देशभर साजरा होत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणातही सोशल मीडियाच्या माध्यमातून या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. करवाचौथ बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. पडद्यापासून ते वास्तविक जीवनापर्यंतचे उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. अशा परिस्थितीत यावर्षी विवाहबंधनात अडकलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांसाठी करवाचौथ खास बनली आहे. यंदा या जोडप्यांसाठी ठरला करवाचौथ हा पहिला सण..
गायिका नेहा कक्करने रोहनप्रीतशी 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्न केले. या दोघांचे लग्न सोशल मीडियावर खूप गाजले होते. फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट मिळाले.
30 ऑक्टोबरला काजल अग्रवाल आणि गौतम किचलू हे जोडपं लग्नबंधनात अडकले. मुंबईतील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये यांचा विहावसोहळा पार पडला. तसेच, कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बरेच लोक या विवाहसोहळ्यास सामील होऊ शकले नाहीत. काजल आणि किचलू यांचा करवाचौथ हा पहिला सण आहे.
यावर्षी 8 ऑगस्टला बाहुबली अभिनेता राणा डुग्गुबातीने मिहिका बजाजशी लग्नगाठ बांधली. राणा आणि मिहिकाचे हैद्राबादमध्ये लग्न झाले. मिहिका आणि राणा काही काळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे यंदा या दोघांनीही हा खुलासा केला. मिहिका बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची मैत्रिण आहे.
टीव्ही सीरियल दिया और बाती हम फेम अभिनेत्री प्राची तहलानने 7 ऑगस्ट रोजी रोहित सरोहासोबत दिल्लीत विवाह केला. 13 ऑगस्ट रोजी इश्कबाज अभिनेत्री नीती टेलर आणि परीक्षित बावा यांचे लग्न झाले. मनीष रायसिंगानी आणि संगीता चौहान यांनी जूनमध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केले.