मुंबई : जॅकलिन फर्नांडिज सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती रंजक पोस्ट्स शेअर करताना दिसत असते. नुकतीच जॅकलिन अशाच काही कारणांमुळे चर्चेत आली आहे. जॅकलिनने तिचे बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जॅकलिन टॉपलेस दिसत आहे. जॅकलिनने हे बोल्ड फोटोशूट शेअर करताच इंटरनेटवर गोंधळ उडाला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.
जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे खूप बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅकलिन टॉपलेस दिसत आहे. फक्त एका कपड्याने तिने स्वत:ला झाकले आहे. या काळ्या आणि पांढऱ्या फोटोमध्ये जॅकलिन खूपच सुंदर आणि हॉट अवतारात दिसत आहे.
जॅकलिनच्या या फोटोला लगेच प्रतिक्रिया मिळत आहेत. जेथे एकीकडे तिची प्रशंसा होत आहे. तर दुसरीकडे, तिला काही ट्रोलर्सचा सामना देखील करावा लागत आहे. नोव्हेंबरच्या थंडीत जॅकलिनचे हे फोटोशूट पाहून लोक तिला कपडे घालण्याची सूचना देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की- बहेन कपडे के लिए मुझसे पैसे ले लेती…मात्र जॅकलिनला अशा ट्रोल्सची काळजी नाही.
जॅकलिनचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सर्व बाजूंकडून कौतुक होत आहे. यापूर्वी जॅकलिन तिच्या बोल्ड फोटोंसह तिच्या इंस्टाग्रामवर खळबळजनक देखील दिसली आहे. काही काळापूर्वी तिने तिचा टॉपलेस फोटो शेअर केला होता.