मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांना अभिप्रेत असणारा संविधानातील भारत साकार केल्यास भारत जागतिक महासत्ता होईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले संविधान दिना निमित्त ना. रामदास आठवले यांच्या बांद्रा येथील संविधान निवासस्थानी 71 संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले.यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी संविधानातील भारत साकार करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कर्यक्रमास ना. रामदास आठवले;त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; सुरेश बारशिंग; ऍड. आशाताई लांडगे; प्राचार्य यु एम मस्के; चंद्रशेखर कांबळे; घनश्याम चिरणकर; रमेश गायकवाड; विजय वंजारी ; गौतम वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. समता; स्वातंत्र्य;न्याय; बंधुता; धर्मनिरपेक्षता या मूल्यांची पेरणी करणारा सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा संस्कार घडविणारा; विविधतेने नटलेल्या भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधीत राखणारे ; भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे संविधान आहे.संविधान आपल्या देशाचा प्राण आहे. आपला श्वास आहे.संविधानाचा आम्हाला अभिमान आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान मानणारे; पूजणारे आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकी नंतर संसदेत त्यांची नेता म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथम संविधाना ला अभिवादन केले होते. त्यामुळे संविधान ते बदलणार असा खोडसाळ आरोप कोणी करू नये. असा इशारा ना. रामदास आठवले यांनी विरोधकांना दिला. संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन वेळोवेळी कायदे निर्माण करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. त्यामुळे संविधान कोणी बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.