मुंबई : मुंबईत आज दिवसभरात नवीन ५४४ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ८६ हजार ५९० झाली आहे. मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज १ हजार ५९८ रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या २ लाख ६२ हजार ७८९ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णाची संख्या १२ हजार ६५ झाली आहे . दुर्दैवाने आज ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १० हजार ९१३ झाली आहे. आज मृत्यू झालेल्यात ८ पुरुष व ३ महिला होत्या . तर ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णाचा दर आता ९२ टक्के इतका झाला आहे . तर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान कोविडवाढीचा दर हा ० .२५ टक्के इतका आहे . ६ डिसेंबर पर्यत एकूण १९ लाख ९८ हजार ७६४ कॉविड च्या चाचण्या करण्यात आल्या , तर मुंबईतील रुग्णांचा दुपटीचा दर हा २८० दिवस इतका झाला आहे.