ट्विटरवर टॉप 5 : सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ सहित या 5 चित्रपटांना वादामुळे मिळाली प्रसिद्धी

मुंबई : ट्विटरने 2020 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटवर सर्वाधिक चर्चेत असलेले हे चित्रपट आहेत. त्याचे हॅशटॅग खूप लोकप्रिय झाले. खूप ट्वीट्स झाले. हे चित्रपट सुशांतसिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ ते दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ पर्यंत आहेत. चला, संपूर्ण  यादी पाहू या…

दिल बेचारा : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या चित्रपटाची भारतात सर्वाधिक चर्चा होती. 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्यांच्या मुंबई निवासस्थानी आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतरचा हा त्याचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता., ज्यामुळे या चित्रपटाचे हॅशटॅग ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झाले होते आणि सर्वाधिक ट्विट केले गेले होते. मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे संजना सांघीने बॉलिवूडमधील मुख्य अभिनेत्री म्हणून डेब्यू केला होता. ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ चित्रपटाचा रिमेक आहे.

छपाक : दीपिका पादुकोणचा हा चित्रपट अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालची बायोपिक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दीपिकाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शांततेत काम करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विद्यापीठाला भेट दिली होती, त्यानंतर ट्विटरवर चित्रपटाविरोधात मोहीम राबविण्यात आली. तसेच या चित्रपटामधील एका पात्राच्या नावाबद्दलही बरीच चर्चा होती. लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्या या पात्राची व्यक्तिरेखा बदलली गेली असल्याचा आरोप करण्यात आला. छपाक वर बहिष्कार घालण्यासाठी हॅशटॅग्स वापरली जात होती.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर  : अजय देवगणचा हा चित्रपट 2020 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अजय देवगनने मुख्य भूमिका साकारली होती, ती होती तान्हाजी मालुसरे. या चित्रपटात सैफ अली खानने औरंगजेबचा सेनापती उदयभानसिंग राठोड यांची नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच, या चित्रपटाविषयीही काही वाद झाले. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते.

थप्पड :  तापसी पन्नू आणि पावेल गुलाटीचा चित्रपट आपल्या थीममुळे चर्चेत आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले होते. हा चित्रपट घरगुती हिंसाचाराविरोधात कडक संदेश देतो.

गुंजन सक्सेना : भारतीय हवाई दलातील अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या या बायोपिकमध्ये जाह्नवी कपूरची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले होते. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला. पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटात गुंजन सक्सेनाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. गुंजन सक्सेना हा सिनेमा महिला अधिकाऱ्यांच्या चित्रपटातील अभिनयामुळे वादात सापडला होता. गुंजन सक्सेना यांच्या दाव्यावर त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी  प्रश्न उपस्थित केले होते.

 

tag- tweeter top-5/dil bechhara/sushant singh rajput/chhapak/thappad/gunjan/tanhaji

 

Social Media