कोरोना प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेतील 779 आरोग्यविषयक रिक्त पदे तात्काळ भरणेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे आयुक्तांना निर्देश

मुंबई : कोरोना साथ रोग पुणे शहरात खूप जास्त प्रमाणात पसरला. त्यामुळे या संकटाला सामोरे जाताना अनेक अडचणी आल्या. या अडचणी सोडविणे व रुग्णासाठी सुविधांचे आवश्यक नियोजन करणेसाठी शहरातील मोठ्या रुग्णालयांबरोबर डॉ. गोर्हे यांनी वेबिनार बैठक घेतली होती. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्येक शुक्रवारी उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांचे समवेत सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकीत आरोग्य विभागाच्या अपुऱ्या कर्मचारी संख्येबाबत अडचणी मांडल्या होत्या.
याबाबत खालील प्रमाणे निर्देश डॉ. नीलम गोर्हे यांनी आयुक्त  विक्रम कुमार यांना दिले आहेत.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची ७७९ पदे अद्यापही रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी व याबाबत ची प्रगती १२ जाने २०२१ कळविण्यास सांगितले आहे ,असेही ऊपसभापती ना.डॉ.नीलमताई गोर्हे यांनी कळविले आहे.
पूणें मनपास दिलेल्या या निर्देशांची माहिती नगरविकास विभाग सचिव व विभागिय आयुक्त यांनाही कळविण्यात आली आहे.
सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध आरोग्यविषयक आपत्ती हाताळण्यासाठी अधिक सक्षम करावे.कोविड व्हायरस नवीन स्वरुपा मध्ये इंग्लंड व युरोप मध्ये आला आहे त्यासाठी आवश्यक प्रतिबंधक नियोजन करावे.

Social Media