टि.आर.पी. घोटाळा मधील मास्टरमाईड पार्थ दासगुप्ता याला अटक

मुंबई : बनावट टीआरपी घोटाळाप्रकरणी पुण्यातून ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल ( BARC ) चे माजी सीईओ पार्थ निर्मल दासगुप्ता (वय ५५) याला आज पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पार्थ निर्मल दासगुप्ता हे टीआरपी घोटाळातील मास्टरमाईंड असून ते अन्य आरोपींच्या मदतीने T.R.P. Manipulation करुन ठराविक टि. व्हि. चॅनेल्सना जास्तीत जास्त महसुल मिळवून देण्याचा बेत आखून तो अनेक साथीदारांद्वारे अंमलात आणल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात पूर्वी अटक करण्यात आलेल्या रोमिल विनोदकुमार रामगडीया याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने Television Rating Points ( T.R.P. ) Manipulation चे काम Broadcast Audience Research Council ( BARC ) या कंपनीचे तत्कालीन सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्या सोबत संगनमताने केले असल्याचे समजले.

त्यामुळे पार्थ दासगुप्ता याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करून , त्याच्याकडे या गुन्हयाचा तपास करणे अत्यंत आवश्यक व तातडीचे असल्याने पार्थ दासगुप्ता याचा शोध घेणेकामी गोवा राज्य येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले मात्र तेथून तो निघून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर पार्थ दासगुप्ता हा पुणे येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक त्याचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले.

पोलीस पथकास तो खेडशिवापूर टोलनाका येथून येत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी खेडशिवापूर टोलनाका येथे पाळत ठेवली असता क्रियेटा गाडी न. एमएच – ०१ – डीई -८ ९९ ३ अशी पुण्याच्या दिशेला जाताना टोलनाक्याकडे मिळून आली . पोलीस पथकाने ही गाडी थांबवून चौकशी केली असता , त्यामध्ये पार्थ निर्मल दासगुप्ता असल्याचे खात्री झाल्यावरुन त्यास ताब्यात घेण्यात आले व स्थानिक पोलीस ठाणे राजगड पोलीस ठाणे , पुणे येथील ठाणे दैनदिनीमध्ये नोंद करुन , पोलीस पथक पार्थ निर्मल दासगुप्ता यास घेवून कक्ष कार्यालयात हजर झाले. दरम्यान कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे तपास केला असता, पार्थ दासगुप्ता हे Broadcast Audience Research Council ( BARC ) या कंपनीत जुन २०१३ ते नोव्हेंबर २०१९ पर्यन्त Chief Executive Officer ( CEO ) म्हणून काम करीत होते . या कंपनीत काम करीत असताना त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करून ठराविक टि.व्ही. चॅनल्सची Television Rating Points ( T.R.P. ) Manipulation चे काम केले आहे.

तसेच ARG Outlier Media Private Limited या कंपनी मार्फत प्रसारित करण्यात येणाऱ्या रिपब्लीक भारत हिंदी न्यूज चॅनेल व रिपब्लीक टीव्ही इंग्रजी न्यूज चॅनेलची तसेच अन्य चॅनल्सची टी.आर.पी. ( Television Rating Points ) गैरकायदेशीर मार्गाने वाढविण्याकरीता त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन त्यास नमुद गुन्हयात आज अटक करण्यात आली आहे . पार्थ दासगुप्ता यास २८ डिसेंबर पर्यन्त क्राईम बॅच कस्टडीत ठेवण्याचे आदेश झाले देण्यात आले आहे .

 

नवीन चित्रपट व मनोरंजन उद्योग धोरणात सवलतीचा वर्षाव,मात्र मराठी चित्रपट सृष्टीची गळचेपी..!

Social Media