सरपंच पदाच्या लिलावाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई  : राज्याचे ग्राम विकास मंत्री, हसन मुश्रीफ यांनी ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदाबाबत होत असलेल्या लिलावाची चौकशी करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे, त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे… बुधवारी  मुश्रीफ म्हणाले कि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी बोली लावली जाने ही बाब लोकशाही साठी घातक आहे, अशा प्रकारे बोली लावली गेली तर फक्त श्रीमंत लोक जिंकतील, गरीब आणि समाजसेवा करणारे नागरिक यांची हार होईल..

मुश्रीफ म्हणाले की ग्रामपंचायत निवडणुकीत, बिनविरोध सरपंच निवडले गेल्यास विकास निधी देणे ही वेगळी बाब आहे पण सरपंच पदासाठी लाखो रुपयाची बोली लावणे योग्य नाही..

काय आहे प्रकरण..
या पूर्वी नाशिक येथील देवळी तहसील येथील उमरणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी लावल्या गेलेल्या बोली चा व्हीडिओ बाहेर आला होता  यामध्ये सरपंच पदासाठी  उमराणे ग्राम पंचायत चे माजी सरपंच प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील दलासाठी 2 करोड़ 5 लाख रुपयाची बोली लावली गेली.. या नंतर उमरणे गावाच्या सरपंचाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले..

Tag-Rural Development Minister Hasan Mushrif

Social Media