मुंबई : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी या जन्मदिवसानिमित्त आज राज्यभरात सावित्री उत्सवाची धूम सुरू होत आहे. यानिमित्त शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि महिला व बालकल्यान विभागातर्फे राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून विविध कार्यक्रम राबविले जातील, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परि।देच्या वतीनेही राज्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षाणातील योगदान, त्यांचे कार्य, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणे, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल, असे प्रा. गायकवाड यांनि सांगितले.
त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मीसावित्री, महिलाशिक्षण_दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने सावित्री उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. यानिमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिनी अंगणवाडी स्तरावर अर्थात गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री शिक्षणाच्या जनजागृतीसाठी मफसावित्री दिंडीफफचे आयोजन, अंगणवाडी, गावातील लहान मुलींना सावित्रीबाईंचा पेहराव करून स्त्री शिक्षणाचे आवाहन करण्यात येणार आहे. महिलांना कार्यक्रमात समाविष्ट करून त्यांच्याकडून सावित्रीबाईंच्या जीवनकथेचे वाचन करवून घेतले जाईल. त्याशिवाय कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कोविड योद्ध्या सेविका, मदतनीसांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ना. ठाकूर म्हणाल्या. अभिनव पद्धतीने नवजात मुलीच्या जन्माचे स्वागत, महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट काम करणार्या महिला बचत गटांचा सन्मान, सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देण्यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित नाटक, गीतांचे आयोजन, तसेच पोषण आहाराविषयी प्रबोधन आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जुन्या रुढी, परंपरा तोडण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे स्थापन करुन या शाळेच्या मुख्याध्यापक बनल्या. त्यानंतर त्यांनी 18 शाळा सुरु केल्या. बालकांच्या हत्या थांबाव्यात विधवांची परिस्थिती सुधारावी म्हणून बालक आणि विधवा आश्रमांची स्थापना केली. विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न केले. महिलांच्या केशवपनाविरोधात नाभिकांचा संप घडवून आणला. शिक्षणाच्या प्रणेत्या, स्रीयांच्या मुक्तीदात्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत रूजावीत म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या वतीनेही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती आरपीआय (ए) च्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले यांनी दिली.
Tag-Savitri festival across the state