सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात’रेझिंग डे’ 2021 सप्ताहनिमित्त बॅनर चे अनावरण व लोकउपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : ‘रेझिंग डे’ 2021 सप्ताह निमित्ताने सी.एस.एम.टी. रेल्वे पोलीस ठाण्यात आज बॅनर चे अनावरण करण्यात आले असून सीएसएमटी रेले पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या नेतृत्वाखाली या सप्ताहानिमित्त रेल्वे पोलीस ठाण्यात लोकउपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

2 जानेवारी 1961 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा स्वतंत्र ध्वज हा तेव्हाचे तत्कालीन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य के.पी. मेडेकर यांच्याकडे सुपूर्द केला. तेव्हापासून 2 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्र पोलीस दल ध्वजार्पण दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने 2 ते 8 जानेवारी याकालावधीत ‘रेझिंग डे’ महाराष्ट्र पोलीस दलात सर्वत्र साजरा केला जातो. त्यामध्ये पोलीस ठाणे स्तरावर समाजभिमुख व जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे समोरील मोकळ्या जागेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या हस्ते रेझिंग डे 2021 च्या बँनरचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पोलीस उप निरीक्षक ज्योती मदकट्टे, अनिल पाडेकर, अशोक माने, पोलीस हवालदार, मंगेश साळवी, प्रवीण कड, मंगेश आयरे, अखिल तडवी, राजेश लोखंडे आदी 55 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

 

Tag-Raising Day/2021/ CSMT Railway Police Station

Social Media