मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ईडीच्या रडारवर असल्याचे सूतोवाच करतानाच पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले आहेत. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले. ते म्हणाले की त्यामुळे सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्यानंतर आता अडसूळ अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर येण्याची चिन्हे आहेत. सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होवू शकते. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बढाया मारत होते, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत का?. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असेही सोमय्या यावेळी म्हणाले. आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे १९९६ पासूनचे पाच वेळा शिवसेनेचे खासदार राहिले आहेत. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
सोमैय्या म्हणाले की, “घोटाळे ज्यानी केले ते आरोप आमच्यावर करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी १३ हजार खातेधारांचे पैसे ढापले. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घोटाळा किती कोटींचा आहे, हे लवकरच समजेल. संजय राऊतांचा चेहरा पाहिल्यानंतर आता बस्स करा असेच वाटले. ठाकरे कुटुंबाला भीती वाटते, त्यामुळे सामनाची भाषा बदलली. आता कोरोनाची बात करत आहेत. शिवसेनेचे अवस्था दयनीय आहे” अशी राजकीय खिल्ली उडवत सोमय्यांनी टिका केली.
Tag-Kirit Somaiya/Shiv Sena MP Anandrao Adsul’s bank scam case /ED