मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई बनली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी तिचा पती आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.
प्रथमच वडील होण्याच्या आनंदात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, आमच्या दोघांनाही सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी मुलगी आली आहे. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खूप आभारी आहोत.. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही ठीक आहेत आणि या जीवनाचा हा अध्याय अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. आम्हाला माहित आहे की आपण निश्चितपणे हे समजून घ्याल की यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हेसीची गरज असेल.’
अनुष्का आणि विराटने 27 ऑगस्ट रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला करून माहिती दिली होती की ते दोघेही लवकरच पालक होणार आहेत. अनुष्का आणि विराटचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनुष्का शर्मा आई कधी बनेल हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूपच उत्सुकता वाटली होती. अनुष्का आणि विराट सोबतच आज त्यांच्या चाहत्यांचीही प्रतीक्षा संपली आहे कारण लहानग्या पाहुणीचे आगमन त्यांच्या घरात झाले आहे.
गरोदरपणातही अनुष्काने तिच्या कामाशी तडजोड केली नाही. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह राहिली आहे. अॅड शूटपासून फोटोशूटपर्यंत अनुष्काने प्रेग्नन्सी दरम्यान सर्व काही केले आहे. अनुष्काने अनेकदा बेबी बंपसह आपले फोटोही शेअर केले होते.
Tag-Actress Anushka Sharma/daughter/Virat Kohli gave information on social media