पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियासाठी 8 नवीन गाड्यांना रवाना करतील

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, 17 जानेवारी ला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियासाठी 8 नवीन गाड्यांना रवाना करतील. या गाड्या वाराणसी, दादर, दिल्ली, अहमदाबाद, रिवा आणि चेन्नई स्थानकांवरून सुटतील. अहमदाबाद-केवडिया जन शताब्दी ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच देखील असेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रेनचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनविण्यासाठी ही खास रचना केली आहे. कोविडनंतर प्रथमच प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक्स्प्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की नियमित पर्यटन सेवा अधिक पर्यटकांना पर्यटनस्थळी आणतील. स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ रेल्वे मंत्रालयाने केवडिया रेल्वे स्थानक बांधले असून त्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

रविवारी दाभोई-चांदोड-केवडिया ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि प्रतापनगर-केवडिया नव्या विद्युतीकरण विभागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रतापनगर हे वडोदरा जिल्ह्यात आहे आणि या भागात नियमित मेमू सेवा सुरू होईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की या कनेक्टिव्हिटीचे मुख्य लक्ष स्थानिक आणि बाह्य पर्यटकांना आकर्षित करणे आहे. ते सर्वात आकर्षक पर्यटन केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.

Tag-Prime Minister Modi will send 8 new trains for the Statue of Unity Kevadia

 

Social Media