मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डीन आणि विभाग प्रमुखांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून अधिक वाढवू नये. कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय होत असल्याने निवृत्तीचे वय वाढवण्यास आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत पालिकेने काढलेले परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे. रिक्त पदे त्वरित भरावीत, सहयोगी प्राध्यापकांना नियुक्ती पत्रे द्यावीत आदी मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आज महापालिकेच्या कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन केले.
पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण संघटनेचे सचिव डॉक्टर रवींद्र देवकर बोलताना म्हणाले कि . , सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये, या प्रमुख मागण्यांसह आमच्या इतर मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत आहोत. रुग्णसेवा विस्कळित न होता हे आंदोलन सुरू आहे. रुग्णालयातील प्रत्येक विभागाचे एक ते दोन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमचे इतर प्रतिनिधी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. रजा टाकून आंदोलन केले जात असल्याने रुग्ण सेवेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही . डीन/एचओडी इत्यादी कोणत्याही प्रशासकीय पदावर तात्पुरते वय वाढविण्यास परवानगी देऊ नये. कोविड (साथीच्या रोगाचा) साथीच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. यासाठी २ वर्षापेक्षा अधिक काळ तात्पुरत्या सेवानिवृत्तीसाठी मुदतवाढ देणारे (विस्तार परिपत्रक रद्द करावे अशीही मागणी त्यांनी केली.
– कनिष्ठ संवर्गातील अन्यायकारक स्थिरता टाळण्यासाठी एमसीजीएम फॅक्टुलीसाठी २ वर्षापलीकडे सेवानिवृत्तीनंतर वयाची मुदतवाढ नसावी आणि इतरांना योग्य प्रशासकीय संधी मिळावी यासाठी सर्वांनी वयाच्या ५८ व्या वर्षी प्रशासकीय पदांचा त्याग करावा. जर, संबंधित प्राध्यापकांनी प्रशासकीय पदाचा त्याग केला नसेल तर त्याला/तिला खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली जाऊ नये.
– कोर्टाच्या आदेशानुसार नवीन कॉर्पोरेशन रिझोल्यूशनसह सुधारित रिअल टाइम बाँड प्रमोशन योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी, ज्यामुळे सर्व विद्याशाखांना लाभ मिळू शकेल.
– प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या थेट भरतीद्वारे जाहिरात देण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. तसेच, पदोन्नतीवरील रिक्त पदे भरावीत. असोसिएट प्रोफेसर आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या विभागातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी व वेळोवेळी पुनरावृत्ती करावी.
– वयाच्या ६२ व्या वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्या वरिष्ठ शिक्षकाला एमसीजीएममध्ये ठेकेदाराच्या आधारे प्रोफेसर इमेरिटस किंवा मानद विद्याशाखा म्हणून रुग्णालयातील सेवेसाठी एमसीजीएमच्या रुग्णालयांमध्ये ठेवले जाऊ शकते.लेला नसल्याची माहिती देवकर यांनी दिली.
मुंबई महापालिका आरोग्य सेवा पुरवते. पालिकेच्या आरोग्य विभागात ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांच्याकडून पालिका रुग्णालयाचे डीन आणि विभाग प्रमुख यांच्या सेवा निवृत्तीचे वय वाढवून घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ डॉक्टरांना विभागप्रमुख आणि डीन आदी पदांवर पदोन्नती मिळणे कठीण जाणार आहे. हा कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय असल्याने त्याला विरोध केला जात आहे. याचे स्थायी समितीतही पडसाद उमटले होते. वरिष्ठ डॉक्टरांचे वय वाढवण्यापेक्षा त्यांना निवृत्ती नंतर मानद डॉक्टर या पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने वाद चिघळला आहे.