.मुंबई : संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलताना राष्ट्रपतींनी सर्व संकेत व प्रथा बाजूला ठेवून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना फायदा झाला असे बेधडक विधान केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे कायदे संसदेत पास झाले असले तरी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या अंमलबजाणीसाठी आवश्यक नियमावली (Rules and regulations) अजून तयार नाही.
शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि केंद्र सरकार त्यात आवश्यक त्या सुधारणा, एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास देखील तयार आहे. अशा परिस्थितीत करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना या कायद्यामुळे फायदा झाला, असे राष्ट्रपती महोदय कशाच्या आधारे म्हणत आहेत ? की सरकारने लिहून दिले ते जसेच्या तसे वाचले ? असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.
Tag-Strange statement of the President on agricultural law/Dr. Ratnakar Mahajan