अर्थसंकल्प 2021-22 : काय स्वस्त, काय महाग?

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प 2021-22 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोना प्रादुर्भाव, मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर असं मोठं संकट होतं. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय याकडे सर्वांचे लक्ष लागलं. (union budget 2021 live finance minister nirmala sitharaman full paperless speech highlights)

बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर 10.15 वाजता कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर संसदेत डिजीटल माध्यमातून बजेट सादर करण्यात आलं. निर्मला सीतारमण यांच्या हातात आज खातेवहीऐवजी टॅब दिसला. देशातील हे पहिलं डिजीटल बजेट आहे. (Union Budget 2021 highlights)

Union Budget 2021 Full speech and highlights
टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी!

काय स्वस्त, काय महाग?

भारतात तयार होणारे मोबाईल स्वस्त होणार, मोबाईल पार्ट्सवरील उत्पादन शुल्क रद्द, सोन्या-चांदीवरील कर कमी होणार : निर्मला सीतारमण

इलेक्ट्रॉनिक, मोबाईल- काही पार्टवर सूट देणार, आयर्न स्टील- कस्टम ड्युटीत सूट मिळणार, तांबे- तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट, टेक्सटाईल्स- कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार, केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार, गोल्ड-सिल्व्हर- कस्टम ड्युटी पुन्हा कमी करणार, अपारंपरिक उर्जा- सोलार पॅनल-इन्व्हर्टस- 5 पासून 20 टक्क्यांवर, ऑटो पार्ट- काही गोष्टीवर कस्टम ड्युटी वाढवली

लेदर, गारमेंट- कस्टम ड्युटी कमी करणार,जेम्स स्टोन- वाढवली, इथाईल अल्कोहोल-

मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढली : मोबाईलवरील कस्टम ड्युटी(Custom duty on mobile) वाढून 2.5 टक्क्यांवर, सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली.

स्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 7.5 टक्क्यांवर, कॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 2.5 टक्क्यांवर, नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 5 टक्क्यांवर, सोलर इन्व्हर्टरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवर,निवडक ऑटो पार्टवरील कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्क्यांवर.

कस्टम ड्युटीला पेपरलेस करण्याची तयारी : सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार.
सोलर उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता, भारतातील सोलर उपकरणांमध्ये वाढ व्हावी म्हणून आयात होणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात येणार

घरे
परवडणाऱ्या घरांच्या व्याजाची मर्यादा वाढवली, एकवर्षापर्यंत सूट वाढवण्यात आली आहे. परवडणारी घरं आणि भाड्याची घरं जुलै 2019 मध्ये 1.5 लाखाच्या व्याजावर सूट देण्यात आली. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल, तर कर्ज 2022 पर्यंत घेणार असाल तर तुम्हालाही या सुविधेचा लाभ मिळेल.

 

Social Media