मुंबई : शर्जिलवर गुन्हा दाखल करायला दिरंगाई शिवसेनेच्या ठाकरे सरकारने का केली ? ज्या पद्धतीने या एल्गार परिषदेत काही ना काही गडबड, धार्मिक भावना दुखावल्या जातात याची पार्श्वभूमी असतानाही परवानगी का दिली ? त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शर्जिलला पळून जाण्यास सरकार मध्ये कुणी मदत केली हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी प्रतिक्रिया
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज दिली.
खऱ्या हिंदुत्ववाचा क्लास नागपूला जाऊन घ्या!
हिंदुत्वाचा खरा क्लास कुठे असतो, त्या नागपूरच्या कार्यालयात वारंवार या आधी आपण भेटलो आहोत. आता ही जाऊन यावे..असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विधानावरुन आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला आहे.
भाजपला बाजूला ठेवायच्या कू हेतू चा पर्याय म्हणून जे सत्तेत आले तेही दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन, आपल्या विचारांना तिलांजली देऊन, त्यांनी देशातल्या जनतेच्या मानसिकतेचा मतांवर भाष्य करणं म्हणजे सूर्यावर थूंकण्यासारखे आहे मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थूंकण्या प्रयोग करु नये, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
शिवसेनेची अवस्था खाली डोकं वर पाय
शिवसेनेची अवस्था खाली डोकं वर पाय अशी झाली आहे. महाराष्ट्रातील कुठल्या व्यक्तीवर कुठल्या नेत्यावर परराज्यातून कोणी टिपणी केली यांना महाराष्ट्र द्रोह आठवतो आणि हे आंदोलन करू लागतात, पण परदेशातून आपल्या देशातील व्यक्तीवर कोणी टीकाटिप्पणी केली की यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात, हे परदेशातील कनेक्शन तुमचे संजय राऊत काय आहे ? हे जनतेसमोर मांडावे आंदोलन कोणी कशा पद्धतीने करावे याची नियमावली स्पष्ट आहेत राऊत साहेब तुम्ही सांगा लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरून आंदोलन करण्याला तुमचे समर्थन आहे का? त्यावेळी तुम्ही काय बोलला नाहीत? असा सवाल ही त्यांनी केला..
शिवसेनेचे डोके ठिकाणावर आहे का?
सामना अग्रलेखातून केलेल्या तुलनेबाबत जो प्रश्न विचारण्यात आले त्यावर आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,
मुळात कशाची तुलना कशाशी करताय? शिवसेनेचे डोके ठिकाणावर आहे का? असे आधी विचारावा लागेल
शर्जिलने केलेल्या अपमानास्पद आणि गुन्ह्याच्या पद्धतीने केलेल्या टिप्पणीवर त्याची तुलना अन्य कुणाची करणे याचा अर्थ यांचे डोकं ठिकाणावर आहे का ?
आता त्याला अटक केली जाईल असे सांगताय ? कधी? आम्ही मागणी केल्यावर? भाजपने आंदोलन केल्यावर? या परिषदेला परवानगी का दिली? परिषदेत वक्तव्य केले त्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्रभर जाऊ का दिले? उस्मानीला मुंबई आणि महाराष्ट्र बाहेर पळून जाण्यात त्याची मदत सत्तेत बसलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने केली आहे.हे त्यांचे पाप आहे त्याला पळून जाऊ दिल्यानंतर आणि भाजपचे आंदोलन केल्यानंतर आता आम्ही त्याला अटक करू असे हे सांगत आहेत, अशी टिका त्यांनी केली.
रामवर्गणीला विरोध आणि पदपथावर हप्ता वसुली जोरात!
एकीकडे राम वर्गणीला विरोध करायचा त्याविरोधात अग्रलेख लिहायचा आणि दुसरीकडे मुंबईच्या फुटपाथवर पोट भरण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या माणसांकडून हप्ता वसूल करायचा असं आश्चर्य वाटणारे काम सध्या शिवसेना करते आहे. एकीकडे राम वर्गणीला विरोध आणि दुसरीकडे पदपथावर हप्ता वसुली जोरात असे काम सध्या सुरू आहे.
हप्ता वसुलीसाठी मा. मुख्यमंत्र्यांचा फोटो कोणी वापरत असेल तर त्याला मा. मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच..त्यामुळे अशा प्रकारे फोटो वापरणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेनेची भूमिका अमिबालापण लाजवणारी
कृषी कायद्यावरुन राज्यसभेत एक भूमिका, लोकसभेत वेगळी भूमिका, आझाद मैदानात आणि आघाडीच्या बैठकीत ही वेगवेगळी भूमिका… शिवसेना सध्या अमिबाला पण लाज वाटेल अशा भूमिका घेतेय. अशी टीका त्यांनी केली.
पोलिसांनी चौकशी करावी
मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मला याची पूर्ण कल्पना नाही, पण ज्या पद्धतीने माहिती समोर येते आहे याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मुंबई पोलिसांनी या महिलेची तक्रार जर असेल तर त्याच्यावर लगेच चौकशी करणारायला हवी.