राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे श्रध्दास्थान, कामगार नेते र. ग. कर्णिक साहेब यांचे निधन
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदय स्थान असलेले माननीय र. ग. कर्णिक साहेब यांची प्राणज्योत नुकतीच काही वेळापूर्वी मालवली. मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात ज्यांचे नाव अमर राहील त्यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्र्टचे माजी सरचिटणीस मा.र.ग.कर्णिक यांचे आज वृध्दोपकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
मा.र.ग.कर्णिक यांनी सलग ५० वर्षे राज्य सरकारी कर्मचा-यांचे समर्थपणे नेतृत्व करुन सन्मानपूर्वक सेवा शर्ती व वेतनाचे लाभ मिळवून दिले. त्यांचे नेतृत्वाखाली ५४ दिवसांचा संप हा कामगार/कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड आहे.
मा. रमाकांत गणेश कर्णिक यांचा जन्म २७/१/१९३० रोजीचा मंत्रालयीन कर्मचारी संघटना कर्णिक यांनी १९५६ साली प्रथम बांधली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्राचे १९६२ पासून स्थापना व नेतृत्व केले ते २०१४ पर्यंत संघटनेचे विद्यमान संस्थापक सल्लागार आहेत. १९९१ पासून खाजगीकरण व कंत्राटीकरण विरोधात लढा उभारला.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अनेक वर्षे देशपातळीवर नेतृत्व
११/८/१९६६ नैमित्तिक रजा आंदोलन केले. कॉ. डांगे प्रतिष्ठानचे विश्वस्त व अध्यक्ष होते. संयुक्त कामगार-कर्मचारी कृती समितीचे चेअरमन होते. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महाघाचे ते मानद अध्यक्ष होते. देश स्तरावरही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समर्थ नेतृत्व मा.कर्णिक यांनी केले. र.ग.कर्णिक यांची अंत्ययात्रा दु.४.०० वा. त्यांचे राहते घर,बांद्रा( प) येथून निघणार आहे.
Tag-State Government Employees Union/Labor Leader R. C. Mr. Karnik