आजपासून कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबई : मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज कोव्हिड लस घेतली. लोकल सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. मात्र, ३१  मार्चपर्यंत आम्ही निरीक्षण करु. जम्बो सेंटर देखील ३१  मार्चपर्यंत सुरुच ठेवणार त्यानंतर आम्ही बंद करण्यासंदर्भात विचार करु. आजपासून कोव्हीड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. धोकादायक रुग्णालयांना आम्ही त्रुटी दूर करण्यासंदर्भात वेळ देऊ  अन्यथा कठोर कारवाई करु, असं यावेळी सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

फ्रंटलाईन वर्करला सुरुवात

कोव्हिडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला आपण सुरुवात केली. फ्रंटलाईन वर्करला सुरुवात केली. ३ लाख ६०  हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेरचे मिळून कर्मचारी आहेत. २१ केंद्रांमध्ये  लसीकरण करण्यात येत. लसीकरणासाठी ११४  युनिट कार्यकरत आहेत. लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे आणि आता दुसरा टप्पा सोबतच सुरु करतोय”, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात अजून दुष्परिणाम नाहीत

“हेल्थकेयर बऱ्या प्रमाणात कव्हर झाले आहेत. दुसऱ्यात फ्रंटलाईन कव्हर एक महिन्यात करायचा आहे. मुंबईत कोणतीही तक्रार लशी संदर्भात नाही. महाराष्ट्रात अजून दुष्परिणाम नाहीत. २  लाख ६५  हजार लशींचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणखीही साठा केंद्र सरकार आपल्या देणार आहे. लशींची उपलब्धता आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

“लोकल सुरु झाल्यानंतर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आणखी १५  दिवस सतर्क राहणार आहोत. ३१  तारखेपर्यंत सेंटर सुरु ठेवले आहेत. अद्याप संख्येत अधिकवाढ झालेली नाही, सगळ्यांनी काळजी घ्यावी. लोकल सर्वांना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भात सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. टप्या टप्याने लोकल सुरु करणार आहोत.” असेही ते पुढे म्हणाले . कोरोना चा १५  दिवसांपूर्वी आढावा घेतलाय. लोकल सुरु झाल्यात. सगळ्या गोष्टींचा विचार करुन अजून  शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही.  मुंबई महानगर प्रदेश परिसराचा विचार करुन निर्णय घेऊ. दर आठवड्याला आढावा घेऊन  एक एक क्षेत्र हळू हळू सुरू करणार असल्याचंही ते  म्हणाले.

“लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एका रुग्णालयात चाचण्या आपण करतोय. जन्माला आलेल्या नवजातशिशूच्या प्रतिजैविका बाबत तपासण्या केल्या जातायत. लसीकरण १८  वर्षांवरील लोकांनाचं द्यायचं आहे.”

धोकादायक अवस्था दुरुस्त केली नाही तर नियमांनुसार कडक कारवाई करणार

धोकादायक अवस्था दुरुस्त केली नाही तर नियमांनुसार कडक कारवाई करणार आहोत. 31 मार्चपर्यंत सज्जता कायम ठेवणार आहोत. रुग्ण संख्या वाढल्या नाहीत, तर कोव्हिड सेंटरसाठी घेतलेल्या त्या-त्या आस्थापनांना इमारती परत करण्याचा निर्णय घेऊ. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत आणि शाळा सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. आम्ही दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेतोय. सकारात्मकता दिसल्यास निर्णय घेऊ. तिसऱ्या टप्यात पत्रकारांना पहिल्या भागात लस देण्याचा प्रयत्न असेल”, अशीही माहिती त्यांनी दिली.

Social Media