चेहरा आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. जेव्हा त्वचा डागरहित असेल तेव्हाच चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसेल. यासाठी, आपण अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतो. परंतु वास्तविक सौंदर्य आपल्या आतून येते आणि त्यासाठी आपण स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमच्या त्वचेवर तेज आणि चमक कायम राखण्यास मदत होईल. आजच्या धावपळीच्या आयुष्यात, जेव्हा आपल्यासाठी वेळ कमी पडतो, तेव्हा काही सोप्या मार्गाचा अवलंब करून आपण आपल्या त्वचेची काळजी घेवू शकतो. Include these things in the diet

ड्राय फ्रुट्स

विशेषत: अक्रोड आणि बदाम ड्राय फ्रुट्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत, ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने आपली त्वचा सुंदर आणि तजेल होते.. अक्रोडमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी एसीट व्यतिरिक्त वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. बदामांमध्ये व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते. त्वचा सुधारण्यासाठी आणि आकर्षक बनविण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश करणे फायदेशीर आहे.

दही त्वचेसाठी फायदेशीर आहे

दहीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्याचबरोबर त्यात प्रथिने, दुग्धशर्करा, लोह, फॉस्फरस देखील आढळतात. दही थंड गुणधर्म असतात त्यामुळे उन्हाळ्यात दह्याचे सेवन फायदेशीर ठरते.  त्यामध्ये असलेल्या लॅक्टिक ऍसिड व्यतिरिक्त झिंक आणि बरेच खनिजे त्वचेसाठी चांगले असतात. अशा प्रकारे, आपल्या आहारात दह्याचा समावेश केल्याने चेहर्‍यावर सुरकुत्या उमटत नाहीत आणि मुरुम तसेच डागांपासून मुक्त होण्यास परिणामकारक ठरते.

हंगामी फळांचे सेवन

संत्री केवळ आरोग्यासाठीच उपयुक्त नसते, तर त्वचेची चमक कायम राखण्यासाठी देखील फायदेशीर असते. आहारात समावेश करण्याव्यतिरिक्त, त्याचा रस त्वचेसाठी देखील वापरला जाऊ शकतो. हे दोन्ही प्रकारे फायदेशीर आहे. तसेच त्वचेवरील ब्लॅकहेड्स स्वच्छ करते. यासाठी कापसाच्या साहाय्याने काही आठवड्यांसाठी आपल्या चेहऱ्यावर संत्राचा रस लावा. यामुळे त्वचा उजळेल, डाग दूर होतील आणि चेहऱ्यावर  चमकही राहील. तसेच हंगामी फळे खाल्याने आपल्या आरोग्यासह आपली त्वचाही निरोगी राहील.

मासे (फिश)चा आहारात समावेश करा

तेलकट मासे हे ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे. ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आणि सुरकुत्यापासून दूर ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे त्वचेचे पोषण करते आणि त्वचा चमकवते.

हिरव्या पालेभाज्या खायलाच हव्यात

जर आपल्याला सुंदर त्वचा टिकवायची असेल तर आपल्या आहारात नक्कीच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. याशिवाय कोशिंबीर म्हणून तुम्ही काकडी, गाजर आणि मुळा वगैरे देखील खाऊ शकता. त्याचा फायदा होतो. याव्यतिरिक्त, जर आपल्याला आपली त्वचा चांगली राखू इच्छित असाल तर कमी तेल आणि कमी मसाले खा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या.

 

 

Social Media