अभिनेता राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : भारतीय चित्रपटाचा शोमॅनचा सर्वात धाकटा मुलगा राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव 58 वर्षांचे होते. राजीवच्या मृत्यूमुळे कपूर कुटुंब आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. राजीव यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रक्रिया सोशल मीडियावर सुरूच आहे. त्याचवेळी  शाहरुख खानसह सर्व सेलिब्रिटी त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी चेंबूर येथील त्यांच्या घरी पोहोचले. कुटुंबातील सदस्यांमध्ये रणबीर कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, बबिता, रणधीर कपूर, नीतू सिंग, आलिया भट्ट, तारा सुतारिया यांचा समावेश आहे.(Actor Rajiv Kapoor dies of heart attack)

रणधीर कपूर यांनी केले अंत्यसंस्कार

संध्याकाळी राजीव यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. फोटोग्राफर विराल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेवटच्या प्रवासाची छायाचित्रे शेअर केली, ज्यात रणबीर कपूर आणि अरमान जैन त्यांच्या काकाला खांदा देतांना दिसत आहेत. वृत्तानुसार राजीव यांच्यावर त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी अंत्यसंस्कार केले. ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले होते.

राजीव कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या अभिनयासाठी ओळखले जातात

राजीव कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या अभिनयासाठी ओळखले जातात. याशिवाय ते ‘एक जान है हम’ चित्रपटातही दिसले होते. त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्यांचा भाऊ ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय 1984 मध्ये प्रदर्शित झालेली आसमान, लवर बॉय, जबरदस्त आणि हम तो चले परदेस या चित्रपटातही राजीव कपूरने अभिनय केला होता. 1990 मध्ये शेवटच्या वेळी ते ‘जिम्मेदार’ चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली होती.

1991 मध्ये त्यांनी हिना चित्रपटाचे दिग्दर्शन

1991 मध्ये त्यांनी हिना चित्रपटाचे दिग्दर्शन केले, तर चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांचे बंधू रणधीर कपूर होते. या व्यतिरिक्त त्यांनी 1996 मध्ये ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाची कारकीर्द सुरू केली होती. हा चित्रपट जास्त हिट ठरू शकला नाही. या चित्रपटात ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये ‘आ अब लौट चले’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 2001 मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सभरवालशी लग्न केले.

विशेष म्हणजे राजीव कपूर हा त्याचा भाऊ ऋषी कपूरसारखा दिसत होता. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंस्टाग्रामवर राजीव कपूर यांचे फोटो शेअर करताना नीतू कपूरने ‘आरआयपी’ कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मागील वर्षी, ऋषी कपूर यांचे कोरोना लॉकडाऊन दरम्यान निधन झाले होते आणि आता राजीव कपूरच्या मृत्यूमुळे या कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे.

Social Media