लाल बहादूर शास्त्री विद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व निर्भया निर्माण समूहाची स्थापना

भंडारा : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात(Lal Bahadur Shastri Secondary and Higher Secondary School) शाळेत मा.प्राचार्या केशर बोकडे यांच्या अध्यक्षतेत महिला तक्रार निवारण समिती ची व निर्भया निर्माण समूहाची स्थापना करण्यात आली. शाळेतील मुलींची संख्या, स्त्री शिक्षक वर्गाचे प्रमाण लक्षात घेता शासनाच्या निर्देशावरुन या समितीचे निर्माण करणे गरजेचे असल्याने ही समिती स्थापिल्या गेली. मुलींच्या शिक्षणास पाठबळ देणे,समस्यांचे निराकरण करुन शिक्षण व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने ही समिती कार्यप्रवण राहणार आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने लॅाकडाऊनच्या काळात निर्भया निर्माण हा वॅाट्स अॅप समूह निर्माण करण्यात आला होता.पालक,महिला बालसमूपदेशक, बाल कल्याण विभाग अधिकारी, पोलिस अधिकारी,वकील,चाईल्ड लाईन प्रतिनिधींच्या मार्गदर्शनात या समितीचे काम चालणार आहे.

अध्यक्ष पदी मेधाविनी बोडखे यांची निवड

आज शाळेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते शाळेतील माध्यमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका सन्मा.मेधाविनी बोडखे यांची निवड करण्यात आली.निमंत्रित सदस्य म्हणून प्राचार्या केशर बोकडे,शिक्षिका सदस्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका गीता प्रधान,पूर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सुनिता ढेंगे, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून नववीच्या विद्यार्थिनी सुहानी बांते,तृप्ती बनपूरकर,साक्षी निखाडे यांची नेमणुक करण्यात आली.

सचिव स्मिता गालफाडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले

सदस्य सचिव स्मिता गालफाडे(Smita Galfade) यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.निमंत्रित अतिथी सदस्य प्राचार्या केशर बोकडे यांनी समितीच्या निर्माणाचे स्वागत केले व निर्माणाचा उद्देश कथन केला.नवनिर्वाचित अध्यक्ष मेधाविनी बोडखे यांनी कार्यकारिणीच्या आगामी संकल्पांचा उल्लेख करुन महिला व मुलींच्या सुरक्षितते विषयी कार्यकारिणीच्या कार्यप्रवणतेवर भाष्य केले.

महिला-तक्रार-निवारण-समिती-व-निर्भया-निर्माण-समूहाची-स्थापना

मुलींच्या प्रतिनीधींनी शाळेतील मैत्रिणी व छोट्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्नरत राहू असा निर्धार बोलून दाखवला.
सभेचे सूत्रसंचालन सदस्य सचिव स्मिता गालफाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतिनिधी सुनिता ढेंगे यांनी केले.
महिला मुलींसमोरील संभाव्य समस्या,सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण,समस्याच उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी यावर मनमोकळी चर्चा करत सभेची सांगता झाली.

Social Media