मुंबई : कोविड-१९ या महामारीमुळे २०२० या वर्षी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा या परिस्थितीतही अखंडपणे सक्रिय होत्या. कोरोनामुळे मोठ्या संख्येने नागरिक भयभीत व बाधीत झाले होते. कोविड-१९ हा आजार विषाणूमुळे होत असल्याने कोविड प्रतिबंधक लस भारतात उपलब्ध होऊन शासनाने त्याचे पध्दतशीररित्या लसीकरण (Covid vaccination)सुरु केले आहे. एका वर्षाच्या आत लस हातात येणे, हे वैद्यकीय तंत्रविज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे अभूतपूर्व यश आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पहिल्या व दुस-या टप्प्यासाठी २३ लसीकरण केंद्रांमध्ये १२५ बूथ कार्यान्वीत केलेली आहेत. आवश्यकतेनुसार त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्यांत येणार आहे.
सदर लसीकरणाची मुख्य वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.
• दि. १३ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ लस(Covid vaccination) महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालीअसुन आतापर्यंत ५३२,१०० एवढ्या लसीकरण मात्रा प्राप्त झालेल्या आहेत.
• दि. १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ होऊन पहिला टप्पा आरोग्य कर्मचा-यांसाठी कार्यान्वित करण्यात आला.
• पहिल्या टप्प्यात ९ अद्ययावत लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली.
• दि. १६ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या दिवशी १,९५७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
• दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करण्या-या इतर कर्मचा-यांसाठी (FLW) कार्यान्वित करण्यात आला.
• दरम्यान लाभार्थ्यांच्या संख्या व सुलभतेसाठी १४ अतिरिक्त लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली व सदर केंद्राची क्षमता दरदिवशी १२,५०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याइतपत वाढवण्यात आली.
• दि. ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस दलासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. हया दिवशी पोलीस कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले व टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.
• वेगवेगळया विभागांशी समन्वय साधून लसीकरणामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी भाग घेतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
• लसीकरण सुरु झाल्या पासून दि. १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबईत १,००,००० (१ लाख ७ हजार ७२५) पेक्षा अधिक लाभार्थ्यांचा लसीकरण टप्पा पार केला असुन यात ८७,४१६ आरोग्य कर्मचारी व २०,३०९ आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यामध्ये एकाही लाभार्थ्यास लसीकरणानंतर कोणतेही गंभीर विपरीत परिणाम झालेले आढळुन आले नाही. तसेच लसीकरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचा-यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे-
वैद्यकीय अधिकारी : ११,६७९
परिचारीका व पर्यवेक्षक : ५,६१४
इतर वैद्यकीय कर्मचारी: ५,३१६
शास्त्रज्ञ : १९२
वैद्यकीय विद्यार्थी : १,२६१
क्षेत्रिय वैद्यकीय कर्मचारी : १,८९६
प्रशासकीय कर्मचारी : ३,३५५
इतर आरोग्य कर्मचारी : ९,२७०
इतर : ३८,५८३
• कोविन डॅशबोर्ड नुसार लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या उपलब्ध माहितीनुसार ५२ टक्के स्त्री आरोग्य कर्मचारी व ४८ टक्के पुरूष आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. या माहितीवरुन स्त्रियांचा लसीकरणास चांगला प्रतिसाद आहे असे दिसते.
• सद्यस्थितीत डिजीटल मंचामार्फत दिलेल्या निमंत्रण संदेशाची वाट न पाहता नोंदणीकृत लाभार्थी उत्साहाने अगोदरच लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करत आहे.