मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विरोधात १५ फेब्रुवारी रोजी पंचवटी येथे साधु-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale)यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन ही महिती दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते.
“विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधुंच्या वेशातल्या २-४ भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणुन हिंदु समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधु परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधु परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे.” : आचार्य तुषार भोसले(Acharya Tushar Bhosale)
हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का?
भोसले म्हणाले की, मात्र आमचा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, की हिंदु समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? १५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, “हा महाराष्ट्र साधु-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही”. मग तुमचेच मंत्री आज साधुंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का ?
स्वैराचारी मंत्रिमंडळ
आचार्य भोसले म्हणाले की,तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजील सारखी विकृती इथे येऊन हिंदुंना शिव्या घालून जाते, आता तर तुमचे मंत्री च साधुंना शिव्या देतात. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्रीमंडळाला लाजवेल असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे. असेच म्हणावे लागेल. नाशिकच्या रामकुंडावर साधु संतांच्या नेतृत्वात शंखनाद करून मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांना पाठीशी घालणारे ठाकरे सरकार यांच्याविरोधात आम्ही आंदोलन करणार