तजेलदार आणि फ्रेश दिसण्यासाठी या 6 घरगुती उपायांचे करा अनुसरण!

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी, शरीर स्वच्छ करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्वचेची स्वच्छता देखील आवश्यक आहे. बरेच लोक त्वचा स्वच्छ करण्यासाठी महाग क्लीन्झर वापरतात. परंतु जवळजवळ सर्व महिला आणि पुरुष त्यांच्या त्वचेचा प्रकार काय याबद्दल संभ्रमितच राहतात. महागड्या उत्पादनांचा वापर केल्याने त्यांना फायदा होईल कि नाही हाही त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्नच असतो.  परंतु आपण या महागड्या उत्पादनांचा वापर न करताही त्वचा स्वच्छ ठेवू शकता, ते देखील काही घरगुती क्लीन्सर वापरुन. कोणाला सुंदर स्वच्छ त्वचा नको आहे? प्रत्येकाची अशी इच्छा आहे की ते सुंदर दिसावेत आणि त्यांची त्वचा तजेलदार असावी.

वाढत्या प्रदूषण आणि खराब आहारामुळे केवळ आरोग्यच नव्हे तर त्वचेचे देखील अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बदलत्या हवामानाचाही आपल्या चेह्यावर सर्वाधिक परिणाम होतो. प्रदूषणामुळे काळे डाग, सुरकुत्या, मुरुम आणि तेज कमी होणे अशा समस्या असू शकतात. परंतु आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन आपली त्वचा निरोगी ठेवू शकता. चला तर, आज आपण आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या घरगुती उपायांबाबत जाणून घेवूया…

आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी वापरा हे उपाय

 

  • टोमॅटो – जेव्हा त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा विचार केला तर टोमॅटोने प्रथम स्थान व्यापले आहे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण त्वचेवर अर्धा टोमॅटो घासू शकता, टोमॅटो त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतो..

 

  • मुलतानी मिट्टी : मुलतानी मिट्टी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर आपण सहजपणे मुलतानी मिट्टीपासून बनवलेल्या पेस्टचा वापर करू शकता, ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होईल.

 

  • पपई : निरोगी राहण्यासाठी तुम्ही आहारात पपईचा वापर केला असेलच पण पपई तुमच्या त्वचेसाठीही चांगली मानली जाते. पपईला ओटमील आणि दुधात मिसळा आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी त्वचेवर हे मिश्रण लावून मसाज करा आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

 

  •  बेसन : तेलकट आणि चमकदार त्वचेसाठी हरभरा पीठ म्हणडेच बेसन दही आणि दही मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते.

 

  • दही : तेलकट त्वचेसाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे, दिवस अखेरीस दोन ते तीन चमचे दह्याने मसाज करून घ्या आणि पाण्याने धुवा. हे आपली त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते.

 

  • स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की हे त्वचेसाठी देखील तितकेच फायदेशीर मानले जाते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. चेहऱ्यावर स्ट्रॉबेरी लावल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.

 

अस्वीकरण : ही सामग्री केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Social Media