लॉकडाऊन की निर्बंध?
मुंबई : सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत लॉकडाऊन जाहीर करावा की निर्बंध घालावेत, अशा पेचात पालिका प्रशासन सापडले आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आढळले ८२३ रुग्ण
मुंबईत बुधवारी ७२१, गुरुवारी ७३६, तर आज ८२३ रुग्ण आढळले. आजची एकूण रुग्णसंख्या ३,१७,३१० झाली. आज ४४० रुग्ण बरे झाले असून, कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २,९८,४३५ झाली. आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ११,४३५ झाली. सध्या विविध रुग्णालयात ६,५७७ रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर : ९४ टक्के.
- आठवडाभरातील कोविड रुग्णवाढीचा दर : ०.१८ टक्के
- रुग्ण दुपटीचा कालावधी : ३९३ दिवस
राज्याची रुग्णस्थिती
- आजचे रुग्ण : ६,११२
- उपचार घेणारे रुग्ण : ४४,७६५
- बरे झालेले रुग्ण : २,१५९
- बरे झालेले एकूण : १९,८९,९६३
- आजचे मृत्यू : ४४
- एकूण मृत्यू : ५१,७१३
- इतर मृत्यू : १,१९१
- एकूण रुग्णसंख्या : २०,८७,६३२