निष्पक्षपणे तपास करून योग्य त्या पध्दतीने सत्य समोर येणार : राठोड प्रकरणी मुख्यमंत्र्याचे मौन सुटले!

मुंबई  : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या वीस दिवसांपासूनचे संजय राठोड प्रकरणावरील मौन सोडत केवळ राजकारणासाठी कुणाला लटकवण्याचा प्रकार होत असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सरकार चालविताना ये न्यायाने चालविण्याची जबाबदारी असल्यानेच या प्रकरणात आपण आता पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र निष्पक्षपणे तपास सुरू असून त्यात योग्य त्या पध्दतीने सत्य समोर येणार आहे. मुख्यमंत्र्यानी यावेळी राठोड यांच्या राजीनाम्याच्या पत्रासह पुजाच्या आई वडीलांनीही भेटून तिची नाहक बदनामी थांबविण्याची मागणी पत्राव्दारे केल्याचा मजकूर माध्यमांसमोर सादर केला.

जयंती की पुण्यतिथी?

ते म्हणाले की, कोविड उपाय योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करणाया विरोधकांनी आपण कोविड योध्द्यांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावत असल्याचे भान ठेवावे. ते म्हणाले की विरोधकांनी कौतुक केले नाही तरी आंतर राष्ट्रीय स्तरावर कोविड बाबत केलेल्या कामाची दखल घेतली गेली आहे. स्वा सावरकर यांच्या जयंती बाबतचा वाद निर्माण करताना नक्की जयंती होती की पुण्यतिथी हे ज्यांना माहिती नाही त्या विरोधकांनीअश्या आरोपांत पडण्याची आणि त्यांना उत्तरे देण्याची गरज नाही. मात्र सीमा प्रश्नावर केंद्रात आणि कर्नाटकात  असलेल्या भाजपच्या सरकारने सहकार्याची भुमिका घेतली तर वेगळ्या पध्दतीने हा प्रश्न सोडविता येवू शकतो. मात्र त्यासाठी यापूर्वीच्या काळात भाजपचे सरकार असून का प्रयत्न झाले नाही याचे उत्तर विरोधकांनी द्यावे.

खा. डेलकर प्रकरणी गप्प का?

पुजा चव्हाण च्या मृत्यू संदर्भात आरोप करणाऱ्या विरोधकांनी दादरा नगर हवेलीतील सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत का प्रश्न निर्माण केला नाही? असा सवाल करत मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करत असताना त्यांना गुजरात आणि केंद्र सरकारने देखील सहकार्य केले पाहीजे. त्यात देखील ज्या कुण्या उच्च पदस्थांची नावे आहेत त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.

लॉकडाऊनची इच्छा नाही

पोहरादेवी येथे शक्ति प्रदर्शन करणा-यांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लॉकडाऊन करण्याची सरकारचीइच्छा नसली तरी मजबूरीने काही ठिकाणी तशी स्थिती निर्माण झाली अहे या साठीच लोकांना मास्क लावण्याचे आणि निर्बंधाचे पालन करण्याचे सरकारचे आवाहन असून त्याबाबत खबरदारी काही दिवस घ्यावी लागणार आहे. मुंबईत त्यासाठी गर्दी विभागण्यासाठी वेळा बदलण्याचा उपाय केला जात आहे. कारण रोजगार सुरू राहावा असा सरकारचा प्रयत्न राहणार आहे असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण

या वेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज आढावा बैठक झाली असल्याची माहिती उपसमितीचे प्रमुख सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला या विषयावर भुमिका मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली ती त्यांनी मान्य केली आहे

Social Media