बारा ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधील हॅकर्सचा सायबर हल्ला : गृहमंत्र्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

मुंबई : मागील वर्षी बारा ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधील हँकर्सचा सायबर हल्ला(Cyber ​​attack ) असू शकतो असा दावा भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाइम्सने दिले होते. त्यानंतर या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर हल्ला झाल्याबाबतची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर अभियानचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणे हा होता. इतकेच नाही चीनने अशी योजना बनवली होती की, जर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला तर संपूर्ण देशाला संपूर्ण अंधारात लोटले जावे असा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याचे फ्यूचर नेटवर्क ऍनालिसीस कंपनीच्या अहवालात म्हटल्याचे देशमुख यांनी सांगितले. Cyber ​​attack by hackers in China

अमेरिकेन सायबरचा खुलासा

याबाबत न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरने केला आहे. पण यातील काही मालवेअर अॅक्टिव्ह झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी रेड एकोने  सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचुप पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितले.

स्काडानुसार यंत्रणेवर हल्ला?

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, सायबर पोलिसांच्या सुपरवायझर कंट्रोल डाटात सिस्टीमच्या (स्काडा) अहवाला नुसार असा हल्ला झाल्याची शक्यता आहे. त्यानुसार महावितरणच्या नेटवर्क सर्वर मध्ये ८ जीबीचा मालवेअर डाटा अपलोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला  असावा जेणे करून ही व्यवस्था कोलमडली आणि मुंबईसह परिसरात अंधार पसरला.

मुंबई अंधारात

मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जवळपास दोन ते तीन तास अंधारात होती. मुंबई महानगर क्षेत्रात पॉवर ग्रीड यंत्रणेत बिघाड झाला होता. दक्षिण मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टने  वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला होता. याशिवाय महावितरणकडून होणारा वीज पुरवठाही खंडित झाला होता. परिणामी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम, उपनगर आणि ठाण्यातील काही भागात अंधारात गेले होते. बिघाड झाल्याने मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल उभ्या होत्या. तर याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. रुग्णालयातील वीज गेल्याने जनरेटरवर व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.

Social Media