मुकेश अंबानी संशयीत स्फोटक प्रकरण चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा NIA ला द्या : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई दि. ५:  देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयीत स्फोटक प्रकरणात संपूर्ण चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा NIA ला द्यावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फधणवीस यांनी विधानसभेत केली आहे.नियम २९३ अन्वये विरोधकांनी उपस्थित केलेल्या कायदा आणि सुव्यवस्था, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार, विविध घटक, समाजांचे प्रश्न आदी विषयांवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

नवा तेलगी घोटाळा

त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार हा आकडेवारीवरून नाही तर ‘सेफ्टी परसेप्शन‘ वरून व्हावा, अशीच भूमिका आपण पूर्वीही घेतली आणि आजही तीच भूमिका आहे. राज्यात नाशिकमध्ये पुन्हा नवा तेलगी घोटाळा उघडकीस आला आहे. असे सांगत त्यांनी निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्राव्दारे हजारो एकर जमिनी परस्पर अन्य लोकांच्या नावे करण्याचे षडयंत्र उघड झाल्याची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, वाळू माफियासंदर्भात कारवाईची अवस्था अतिशय वाईट आहे. प्रचंड मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. भंडारा जिल्ह्यात तर रेती तस्करांनी अख्खी पोलिस चौकी जाळून टाकली. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ६ किमीवर ही घटना घडावी हे दुर्दैवी आहे.

मुकेश अंबानीच्या घरासमोर स्फोटके

ते म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली.हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते. त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या होत्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी सचिन वझे यांना याबाबतच्या तपासातून काढले होते. मात्र ज्यांची गाडी चोरीला गेली, त्या मनसुख हिरेन यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला होता. वझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे मुद्दे शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. ही संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी आमची मागणी आहे. असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणातील मनसुख हिरेन यांचा मृयदेह सापडल्याची घटना घडल्याचेही काही वेळाने फडणवीस यांनी माहितीच्या मुद्याव्दारे सांगितले.

हिंगणघाटच्या निर्भयाला न्याय द्या

फडणवीस म्हणाले की, हिंगणघाट च्या घटनेनंतर शक्ती कायद्याबाबतग सरकारने हालचाली केल्या मात्र ना तिच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, ना तिच्या कुटुंबात नोकरी दिली. अश्या प्रकारे महिला अत्याचाराच्या अनेक घटना आहेत. यादी वाचली तर कमी पडेल. असे ते म्हणाले. त्यांनी आरोप केला की, महिला अत्याचार रोखण्यासाठी कोणतीही पाऊल राज्य सरकारने उचलले नाही. ते म्हणाले की, दलित अत्याचाराच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या. राज्यकर्त्यांचे आपल्याला पूर्ण समर्थन आणि आपण कसेही वागलो तरी चालते, असा समज जेव्हा गावगुंडांमध्ये निर्माण होतो, तेव्हा असे प्रकार वाढतात. असे ते म्हणाले. पोलिसांविरुद्ध कुणीही वाईट बोलले, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असे सांगत त्यांनी नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या धुळ्यातील सत्तारूढ पक्षांचे नेते बोलतात, तेव्हा त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यानी केली.

Social Media