आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम जेष्ठ गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.

या बैठकीस निवड समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य अनिल काकोडकर, बाबा कल्याणी ,डॉ प्रकाश आमटे,दिलीप प्रभावळकर ,संदीप पाटील सहभागी झाले होते.
निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार सन 1997 पासून देण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप रु.10 लाख, स्मृतीचिन्ह व मानपत्र शाल व श्रीफळ असे आहे.

Maharashtra Bhushan Award to be given by Maharashtra government Renowned senior singer Asha Bhosle was decided to give maharashtra bhushan award for the year 2020

Social Media