आ. रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला : नाना पटोले

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा सदस्य रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की,  अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता. कार्यकर्त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून जात असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी आपण रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आजारपणावर मात करून ते पुन्हा लोकसेवेला सुरुवात करतील अशी अपेक्षा होती पण शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस परिवार एका निष्ठावान कार्यकर्त्याला मुकला आहे.

रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 

रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनामुळे मनमिळावू सहकारी गमावला : बाळासाहेब थोरात

Raosaheb Antapurkar’s death,  loss of friendly colleague: Balasaheb Thorat

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कार्यरत असणारा, निस्वार्थी, मनमिळावू सहकारी गमावला आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, अत्यंत गरीब परिस्थितीतून संघर्ष करून आलेले रावसाहेब अंतापूरकर अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरीब जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहिले. मृदू स्वभाव आणि दांडग्या जनसंपर्कामुळे देगलूरच्या जनतेने त्यांना दोनवेळा बहुमताने निवडून दिले होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष अंतापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे थोरात म्हणाले.

Expressing deep sorrow over the passing away of Raosaheb Antapurkar, Thorat said that Raosaheb Antapurkar, who had struggled from a very poor situation, continued till his last breath for the benefit of farmers, hardworking, labourers, poor people and for the development of the constituency. He was elected twice by the people of Degalore by a majority because of his soft nature and strong public relations. His death has caused irreparable damage to the Congress party.

 

Social Media