भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज सकाळी पुष्पहार वाहून अभिवादन केले.

याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष,आमदार नाना पटोले, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल , नगरसेवक / नगरसेविका, उप आयुक्त (परिमंडळ – २) विजय बालमवार, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मान्यवर पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हेही समवेत उपस्थित होते.

तसेच महापालिका मुख्यालय सभागृहातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास नगरसेविका श्रीमती अरुंधती दुधवडकर यांनी आज पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उप आयुक्‍त (आपत्कालीन व्यवस्थापन ) प्रभात रहांगदळे, महापालिका उप चिटणीस सईद कुडाळकर हे मान्‍यवर उपस्थित होते.

Mumbai Mayor Smt Kishori Pednekar, Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale, Maharashtra State Home Minister Dilip Valse-Patil, Textiles Minister and Mumbai City Chief Minister Aslam Sheikh, Maharashtra Pradesh Congress President, MLA Nana Patole, MP Rahul Shewale, former MP Bhalchandra Mungekar, Municipal Commissioner Iqbal Singh Chahal also visited Dr. He saluted the memory of Babasaheb Ambedkar.

Social Media