अमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिलाभगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचा-यांशी साधला.
शासन महिलाभगिनींच्या खंबीरपणे पाठीशी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
The government strongly supports women’s sisters – Women and Child Development Minister Ad. Yashomati Thakur
मेळघाटातील महिला वनकर्मचा-यांना काम करताना येणा-या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचा-यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाशकुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.
महिला वनकर्मचा-यांशी संवाद(Interaction with women forest workers)
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिलाभगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना संरक्षक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. महिला वनकर्मचा-यांशी बोलताना अवमानजनक भाषेचा वापर होणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्र संरक्षक दलातील वनकर्मचा-यांचे पगार वेळेत न होणे अशा गंभीर तक्रारी या भगिनींकडून होत आहेत. वन प्रशासनाने त्यांची तत्काळ दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी वन प्रशासनाला दिले.
विशाखा समितीचे कार्य योग्यरित्या चालवा(Run the work of vishakha committee properly)
महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरीत्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचा-यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनाधिका-यांना दिले.
महिला वनकर्मचा-यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.
अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा(Resist injustice in time)
महिला वनकर्मचा-यांना कुठलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझ्या फेसबुक पेजवर मोबाईल नंबर जाहीर केला आहे. मला व्हाटसॲपवर संदेशही पाठवता येईल. निर्भिडपणे आपली समस्या मांडा. अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, असा संवाद त्यांनी महिलाभगिनींशी साधला.
मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
CM to follow up on demands
विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचा-यांना वेळेवर पगार मिळावा, बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला वनकर्मचा-यांनाही मिळावी व इतरही समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा दिलासा महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी दिला.
Taking note of the complaints received by the women forest staff of Melghat about the difficulties faced by the seniors, the Guardian Minister made a secret visit to various places in the remote areas of Melghat for two days in a continuous time and interacted directly with the women forest staff to know their problems and boost their morale. Project officer Mithali Sethi, conservator of forests Avinash Kumar, Navalkishore Reddy, Piyusha Jagtap etc. were present on the occasion. The Women and Child Development Minister visited Mangia, Harisal, Bori, Arbitration, Chitri, Jaitadehi, Motha, Amzari, Shahpur villages in Dharani taluka as well as Dhargarh in Akot wildlife area.