नाशिकमध्ये अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित; 22 रुग्ण दगावले, 35 गंभीर अवस्थेत

नाशिक : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेकडो रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे असताना दुसरीकडे नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीत झालेल्या गळतीनंतर अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला , त्यामुळे 22 रुग्ण दगावल्याची असून 35 रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे .

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज हा प्रकार घडला. या रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाला होता. त्यामुळे सर्वत्र गॅस पसरला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यातच रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक झाल्याने तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अनेक कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळत नसल्याने दगावत आहेत. तर नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 22 रुग्ण दगावले आहेत.

 

महाराष्ट्र शोकमग्न आहे! : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Maharashtra is in mourning! Chief Minister Uddhav Thackeray)

“ कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत

या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर(Rs 5 lakh each announced to the heirs of the deceased)

 

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश(CM orders high level inquiry)

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की
कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

The corona virus has hit the state. The number of patients is increasing rapidly. Hundreds of patients are in need of ventilators, oxygen. On the other hand after leakage in oxygen tank at Dr Zakir Hussain Hospital of Municipal Corporation in Nashik oxygen supply was cut off for half an hour , so 22 patients have died and 35 patients are in critical condition.

Social Media