नागपूर : शेती आणि पिण्यासाठी पाणी वितरण करणार्या जलसंपदा विभागातील कंत्राटदारांनी कोरोना महामारीत समाजऋण फेडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने अजनी वैनगंगानगरातील जलसंपदा विभागाच्या आवारात 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू होत आहे. या केंद्राचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवार 22 एप्रिल 2021 रोजी झाले. याप्रसंगी कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते, कॉन्ट्रॅक्टर अॅण्ड बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, माजी अध्यक्ष पवन चोखानी, बीसीके नायर, डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे, डॉ. सीमा दंदे यांचे सह आरोग्य सेवा देणारे सहकारी तसेच मुख्य अभियंता डॅा. प्रकाश पवार, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, राजेंद्र सोनटक्के, रोशन हटवार, प्रवीण झोड, उपस्थित होते.
१०० बेड्सचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले
Free 100 bed covid care centre set up
याप्रसंगी जलसपंदा मंत्री जयंतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. नागपूर येथे विदर्भ सिंचन विकास महामंडळ, नागपूर कॉन्टॅक्टर ॲन्ड बिल्डर्स असोसिएशन ॲाफ विदर्भ आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांच्या मदतीने अजनी येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात १०० बेड्सचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले आहे. आजपासून हे कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. राज्यभरात कोरोनाने थैमान घातला आहे. अशा परिस्थितीत अजनी येथील हे कोविड केअर सेंटर अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम करेल याबाबत मला विश्वास आहे. सर्वांनी प्रयत्न केले तर आपण या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. देशभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर आहे हे दिसून येते. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काम करायला हवं. संकट उंबरठ्यावर आहे, त्याला परतावून लावणे ही काळाची गरज. या परिस्थितीत असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, दंदे फाऊन्डेशनचे डॅा. पिनाक दंदे व आमचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांनी जो पुढाकार घेवून रूग्णांना मदत करण्यासाठी कार्य करीत आहे हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल यांची मला खात्री आहे. या प्रकल्पासाठी जे सढळ हाताने मदत करत आहेत त्या सर्वांचेच मी आभार मानतो.
कोरोना बाधितांसाठी नक्कीच दिलासा (Relief for corona affected)
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वैनगंगा नगर अजनीत कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात काही इमारती सध्या रिकाम्या आहेत. त्यांचा उपयोग कोरोना बाधितांसाठी झाला तर नक्कीच त्यांना दिलासा मिळेल. म्हणून प्रवीण महाजन यांनी याची कल्पना जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सांगितली. त्यानुसार कॅान्ट्रक्टर बिल्डर्स असोशिएशन ॲाफ विदर्भ, दंदे फाऊन्डेशन व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे संयुक्त पुढाकाराने 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. याकरिता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे विशेषत: जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अतिरीक्त मुख्य सचिव विजय गौतम यांचीही परवानगी घेण्यात आली. त्यानुसार शनिवार 24 एप्रिल 2021 पासून प्रत्यक्षात हे कोरोना उपचार केंद्र लोकांच्या सेवेत रूजू होणार आहे. या केंद्राला नागपूर महानगर पालिका आणि इतर कार्यालयानेही परवानगी दिली आहे. आता या केंद्रात ज्यांना विलगीकरणात राहायचे त्यांना ठेवले जाईल. काही खाटा ऑक्सिजनयुक्त राहतील. विशेष म्हणजे या केंद्रात विलगीकरणात राहणार्यांना चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण एवढेच नव्हे तर शुद्ध पाणी पूर्णत: मोफत दिले जाणार आहे. दरम्यान येथील कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी डॉ. दंदे फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांचे सहा डॉक्टर 15 परिचारिका आणि इतर कर्मचारी चोवीस तास सेवेत राहतील अशी माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली.
चांगले कार्य करणार्यांचे अभिनंदन (Congratulations to the good doers)
कंत्राटदार हा विश्वकर्माप्रमाणे कर्तव्य पार पाडतो. आज तर आपण कोरोना महामारीत घेतलेला पुढाकार हा नक्कीच शेकडो लोकांना जीवदान देणारा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात प्रथमत: जलसंपदा विभागाने असा पुढाकार घेत कंत्राटदारांन सोबत कोरोना उपचार केंद्र सुरू करावे, ही बाब नक्कीच अभिनंदनीय आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले. आपल्या हातून चांगले सत्कर्म घडावे याकरिता ज्यांनी याकरिता प्रयत्न केले त्या डॉ. पिनाक दंदे, डॉ. सीमा दंदे, प्रवीण महाजन, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते यांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले.
Vidarbha Irrigation Development Corporation has an office in Vainganga Nagar Ajanit. Some buildings in the premises of this office are currently vacant. They will definitely be relieved if they are used for the corona affected. So Praveen Mahajan shared the idea with the officials of the water resources department. Accordingly, efforts were made to set up a 100 bed corona treatment centre under the joint initiative of Contractor Builders Association of Vidarbha, Dande Foundation and Vidarbha Irrigation Development Corporation Nagpur.