नागपूर : नागपूरसाठी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन (oxygen) घेऊन दोन टँकर सकाळी पोहोचले. त्यातून शासकीय आणि खाजगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी ४१८० जम्बो सिलेंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे तीन हजार हून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे. हे टँकर सकाळी बुटीबोरी येथे दाखल झाले. याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल यांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आभार मानले आहेत.
वाहतुक व्यवस्था सुद्धा निकोने केली (Niko also made the transport arrangements)
हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते. २१ एप्रिल रोजी हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज २४ एप्रिल रोजी दोन टँकर्स नागपुरात पोहोचले. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजन नागपुरात आला. हा ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे.
Two tankers arrived in the morning with 38 metric tonnes of oxygen for Nagpur. It will fill 4180 jumbo cylinders at four locations including government and private hospitals. It will meet the requirement of more than 3,000 oxygen beds. The tankers arrived at Butibori in the morning. Jaiswal Niko chairman Basantlal Shaw and co-managing director Ramesh Jaiswal have been thanked by former chief minister and leader of opposition in the assembly Devendra Fadnavis for this.