Beauty Tips : चमकणाऱ्या त्वचेसाठी वापरा या फळांच्या सालीपासून तयार केलेले फेसपॅक!  

आत्तापर्यंत चांगले आरोग्य राखण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला तुम्ही ऐकलाच असेल, परंतु तुम्हाला ठाऊक आहे की जर फळं तुम्हाला चांगले आरोग्य मिळविण्यास मदत करत असतील तर फळांचे साल देखील तुमचे सौंदर्य वाढविण्यास मदत करू शकते. चला.. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी याचा उपयोग कसा करायचा  ते थोडक्यात जाणून घेऊया…

संत्र्याची साल(Orange peels) 

चेहऱ्यावरील  डाग, मुरुम आणि टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी संत्र्याची साल बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये 2 चमचे कच्चे दूध आणि दोन चिमूट हळद मिसळा आणि हा फेस पॅक प्रमाणे चेहर्‍यावर लावा. पॅक सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा.

लिंबाची साल (Lemon Peel )

टॅनिंग पासून सुटका करण्यासाठी लिंबाची साल बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर  फेसपॅक म्हणून वापरा.

केळीची साल (Banana Peel)

टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी आपण केळीच्या सालच्या आतील पांढर्‍या भागाला हलक्या हातांनी चेहऱ्यावर  वीस मिनिटे चोळावे. त्यानंतर चेहरा धुवा. असे केल्याने चेहर्‍याची चमक वाढण्यास मदत होते..

आंब्याची साल(mango peel)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आंब्याच्या सालाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर  लावल्यास मुरुम आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यासाठी आंब्याच्या साल वाळवून पावडर बनवून त्यात गुलाबाचे पाणी, गव्हाचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर  पेस्ट म्हणून वापरा.

To get rid of facial blemishes, acne and tanning, finely chop the orange peel and make a paste. Now mix 2 tablespoons of raw milk and two pinch of turmeric in this paste and apply it on the face like a face pack. Wash your face with cold water when the pack dries up.

Social Media