‘जय जय महाराष्ट्र माझा…!’

मुंबई : तरुणांच्या रक्तात भिनभिनणारे, शरीरात नवचैतन्य निर्माण करणारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या गौरव गीताचा महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या हिंदी, इंग्रजीसह विविध तीस बोली भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागातील साहित्यिकांच्या “ माझी मायबोली ” या व्हाट्सअप्प गृपच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली आहे. महाराष्ट्राच्या गौरव गीताचा तब्बल तीस भाषांमध्ये अनुवाद करण्यात आलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या पुस्तकाचे महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Din)औचित्य साधून ऑनलाइन प्रकाशन (Online Publications)आज करण्यात आले. विविध भाषांमधील प्रथमतः च अनुवाद करण्यात आलेल्या या गीताचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

महाराष्ट्राचे गौरव गीत(Pride Song of Maharashtra)

दरवर्षी महाराष्ट्र दिनी आणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्राचे गौरव गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! कवी राजा बढे लिखित व संगीतकार श्रीनिवास खळे (Composer Srinivas Khale)यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहीर साबळे (Shaheer Sable)यांनी त्यांच्या खणखणीत आवाजात गाऊन अजरामर केले आहे. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या गाण्याचा महाराष्ट्रातील तीस बोली भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. अनेक साहित्यिक सदस्य असलेल्या माझी मायबोली या व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये या गाण्याचा अनुवाद करण्याची संकल्पना पुढे आली असल्याचे गृप मधील निसर्गमित्र रोहिदास डगळे यांनी सांगितले. या संकल्पनेला ग्रुपचे समन्वयक नितीन खंडाळे यांसह अनेकांनी दुजोरा दिल्याने महाराष्ट्रातील अनेक बोली भाषांसह शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या ज्या बोलीची आजपर्यंत कुठेही नोंद नसणारी “ मानकरी ” बोली देखील या निमित्ताने या ग्रुपला जोडली गेली आहे. स्थानिक, प्रादेशिक भाषांसह विविध महत्वपूर्ण माय बोलींचा अभ्यास त्यांच्या शब्दांचा व बोलीचा संग्रह, संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत रोहिदास डगळे यांनी व्यक्त केले आहे.

माझी मायबोली(My MyBoli)

साधारणतः जानेवारी महिन्यात “ माझी मायबोली ” या व्हाट्सअप्प ग्रुपची निर्मिती झाली असून महाराष्ट्रातील विविध काना कोपऱ्यातील एकूण ३० च्या जवळपास माय बोलींचा समावेश या समूहात अनुवादकांच्या सहाय्यने झाला आहे. या ग्रुपचे चाळीसगावचे समन्वयक नितीन खंडाळे यांनी अहिराणी बोली भाषेत जय जय महाराष्ट्र माझा.. या गाण्याचा अनुवाद केल्यानंतर वैभव तुपे यांनी बागलाणी अहिराणी बोली भाषेत, मानकरी बोली – विठ्ठल निरवारे तर डांगाणी बोली – रोहिदास डगळे, लेवा गनबोली – डॉ. प्रशांत धांडे, तावडी बोली – डॉ. प्रकाश सपकाळे, आदिवासी तडवी-भिल्ल बोली – रमजान तडवी, वऱ्हाडी बोली – अरविंद शिंगाडे, मराठवाडी बोली – डॉ. बालाजी इंगळे, नगरी बोली – काकासाहेब वाळूंजकर, पंढरपूरी बोली– कृष्णा कांबळे, चंदगडी बोली – नंदकुमार मोरे, बंजारा-गोरबोली – एकनाथ गोफणे, परदेशी बोली – विजयराज सातगावकर, खानदेशी लेवा गुजर बोली – ममता पाटील, पोवारी बोली – रणदीप बिसने, झाडीबोली – पालीकचंद बिसने, डांगी बोली – भावेश बागुल, राठवी पावरी बोली – अमित डूडवे, बारली पावरी बोली – संतोष पावरा, आदिवासी-मावची बोली – हर्षदा पराडके, आदिवासी ठाकर बोली – सोमनाथ उघडे, वारली बोली – राजन गरुड, मालवणी बोली – मेघना जोशी, आगरी बोली – तुषार म्हात्रे, दखनी बोली – डी. के. शेख, सामवेदी कोकणी बोली – जोसेफ तुस्कुनो, वाडवळी बोली – स्टँन्लीगोन्सालविस, हिंदी अनुवाद – काकासाहेब वाळूंजकर, इंग्रजी अनुवाद – सुनिता उबाळे-पठाडे आदींनी विविध भाषेत गाऊन योगदान दिले आहे.

अशा अनेक माय बोली लवकरच या समूहाला जोडल्या जातील अशी अपेक्षा या ग्रुपमधील सदस्यांकडून व्यक्त केली जात असून भविष्यात बालभारती मधील इयत्ता १ ते १० पर्यंतच्या वर्गाच्या मराठी कवितांचे(Marathi Poems) माय बोली मध्ये प्रायोगिक तत्वावर हौशी प्रयोग करण्याचा मानस शहापुरचे निसर्गमित्र रोहिदास डगळे (Prakritimitra Rohidas Dagle)यांनी व्यक्त केला.

 

The glory song of Maharashtra, which plays every year on Maharashtra Day and Shiv Jayanti, is Jai Jai Maharashtra Mera, Garja Maharashtra Mera! Written by poet Raja Badhe and composed by composer Srinivas Khale, the song is sung by Shaheer Sable in his clanging voice. The song, which has gained huge publicity, has been translated into thirty dialects in Maharashtra.Prakritimitra Rohidas Dagle from Group said that the concept of translating the song into various languages has come up through my WhatsApp group My MyBoli, which has many literary members. With the concept confirmed by many, including the group’s coordinator Nitin Khandale, the “standard” dialect, which is still not recorded anywhere, has also been added to the group, counting the last components, including many dialects in Maharashtra.Rohidas Dagle has opined that the study of various important My Dialects, including Nick, regional languages, needs to be preserved and preserved.

Social Media