मुंबई : निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आणि १९८३ च्या तुकडीच्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी मेधा गाडगीळ (Medha Gadgil) यांची ‘मॅट’(MAT) अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
२९ वर्षानंतर प्रथमच महिलेचा बहुमान(Woman honoured for first time after 29 years)
गेल्या २९ वर्षानंतर प्रथमच एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे. मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती (नि) मृदूला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मेधा गाडगीळ यांनी आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली. फडणवीस सरकारच्या कालखंडात अजोय मेहता यांच्या नियुक्तीसाठी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्यासाठी पात्र असून डावलण्यात आल्यानंतर गाडगीळ यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली होती. मेधा गाडगीळ यांनी आपल्या ३६ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत सहाय्यक जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक ऊद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह(अपिल) आणि अतिरिक्त मुख्य सचिव वैद्यकिय शिक्षण विभाग यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
Medha Gadgil, retired Additional Chief Secretary and senior administrative officer of the 1983 batch, has been appointed as a Member (Administration) at the MAT, the Maharashtra Administrative Tribunal.