बॉलिवूड सेलिब्रिटींना पैसे देऊन व्टिट करवून घेतले जातात : नितेश राणे यांचा गंभीर आरोप

मुंबई : ठाकरे सरकारने कोरोनाची स्थिती हाताळण्यात येत असलेले अपयश झाकण्यासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटनी, करिना कपूर, कतरिना कैफ(Katrina Kaif), फरहान खान(Farhan Khan) यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर(Kareena Kapoor) किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींना पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी  केला आहे.

तिजोरीत खडखडाट असूनही(Despite the clatter in the safe)

राज्याच्या सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने कोरोनाच्या काळात कर्मचा-यांचे पगार वेळेवर होत नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसिध्दीसाठी आणि समूह माध्यमांतून प्रतिमा संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांना मंजूरी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता राणे यांनी आरोप केल्याने सरकारची पोलखोल झाली आहे.

व्टिट करण्यासाठी तीन लाख(Three lakhs to tweet)

आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडे पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आले, किती बिले झाली, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना व्टिट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

तर निर्बंध कशाला वाढवला?(So why increase the restrictions?)

राणे म्हणाले की, ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर टाळेबंदी निर्बंध ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आले? ते म्हणाले की, ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने आपण अपयशी असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये टाळेबंदी हटवण्याची हिंमत नाही.

तर अनलॉक झाले पाहिजे होते(So should have been unlocked)

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने निर्बंध वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

The Thackeray government has given work to rain drop agency to cover up the failure sits in handling the corona situation. The agency is in touch with many actors like Disha Patni, Kareena Kapoor, Katrina Kaif, Farhan Khan. You look at kareena kapoor or katrina kaif’s recent tweets. BJP MLA Nitesh Rane has alleged that these Bollywood celebrities are being tweeted with money.

Social Media