अक्षय कुमारचा पहिला स्क्रीन लूक व्हायरल, चाहत्यांकडून होतेय प्रशंसा…

मुंबई : अक्षय कुमार (Akshay kumar) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज असे झाले आहे की चाहते प्रत्येक चित्रपटात फक्त चांगल्याच गोष्टी पाहणे पसंत करतात. अक्षय कुमार देखील सध्या सामाजिक मुद्यांवर बनलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येतो. दिर्घकाळापासून अनेक प्रकारच्या विषयांवर चित्रपट चाहत्यांना देणाऱ्या अक्षय कुमारचा एक अनेक वर्षांपासूनचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खिलाडी कुमार जेव्हापासून फिल्म इंडस्ट्री मध्ये आहे तेव्हापासून मार्शल आर्ट मध्ये ट्रेंड आहे आणि त्याची ओळख ऍक्शन हीरो म्हणूनच आहे. अक्षय कुमारचा आता स्क्रीन टेस्ट करतानाचा एक सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. अचानक या कलाकाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून चाहते (fans) वेडे झाले आहेत.

 

 कलाकारांच्याच आश्चर्यकारक प्रतिक्रिया…

 The artist’s surprising reaction…

वास्तविक अक्षयचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये तो फारूख शेखचा चॅट शो ‘जीना इसी का नाम है’ यामध्ये दिसून येत आहे. या शो मध्ये तो पाहूणा कलाकार म्हणून उपस्थित होता. त्या शोमध्ये अक्षयला त्याचा स्क्रीन टेस्ट करतानाचा व्हिडीओ दाखविण्यात आला होता. व्हिडीओमध्ये अक्षय मार्शल आर्ट करताना दिसून येत आहे. त्यानंतर एक एक्टिंग सीन क्रिएट करताना दिसून येत आहे. त्याच्यासोबत या व्हिडिओ मध्ये ऍक्ट्रेस नगमा देखील आहे. दोघे एकमेकांसोबत रोमॅंटिक सीन करत आहेत. विशेष म्हणजे जेव्हा या शोमध्ये अक्षय त्याचा स्क्रीन टेस्ट व्हिडिओ पाहतो तेव्हा तो हसून सांगतो की ‘बाल कितने बडे थे’.

हेही वाचा...अदार पूनावाला यांनी लस बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला विकले संपूर्ण शेअर्स! –

अक्षय कुमारचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चाहते खिलाडी कुमारची खूप प्रशंसा करीत आहेत. त्याच्या अगामी कामाविषयी (workfront) बोलायचे झाले तर अक्षय कुमार लवकरच ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतु’ आणि ‘बेल बॉटम’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Akshay Kumar’s first screen look went viral after years, the actor himself had a shocking reactionS

Social Media