Hypertension During Pregnancy : गरोदरपणात उच्च रक्तदाबावर कसे नियंत्रण कराल?

नवी दिल्ली : Hypertension During Pregnancy : गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबाची आकडेवारी पाहिली तर, १००पैकी ८ महिलांना उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशनची समस्या उद्भवते. जर हि समस्या गर्भधारणेदरम्यान उद्भवली तर याचा धोका आई आणि मुलासाठी वाढतो. यामुळे प्रीक्लेप्सिया, जेस्टेशनल, मधुमेह (Diabetes), हृदयविकाराचा झटका(Heart attack), मूत्रपिंड निकामी होणे(Kidney failure), अकाली प्रसूती (Premature delivery), जन्माच्यावेळी कमी वजन, (Low birth weight) आणि स्टिलबर्थ इत्यादीचे कारण बनू शकते. गरोदरपणात उच्च रक्तदाब तुमच्या प्रसूती काळात परिणाम करू शकतो. जर असे झाल्यास गरोदर महिलांसाठी सामान्य प्रसूती धोकादायक असू शकते. तसेच दीर्घकाळापासून उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास प्रसूती ऑपरेशनद्वारे करावी लागते.

तीव्र रक्तदाबामुळे वेळेआधीच मुलाचा जन्म होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये बाळ ३७ आठवडे पूर्ण होण्याआधीच जन्माला येऊ शकते.

गरोदरपणात उच्च रक्तदाबावर कसे नियंत्रण कराल..

How to control high blood pressure during pregnancy.

  •  सोडियमयुक्त खाद्यपदार्थ जसे की लोणचे, गोठवलेले पदार्थ आणि डबाबंद सूप चे सेवन करू नये.
  • उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या गरोदर महिलांनी चांगला आहार घेणे आवश्यक आहे.
  • तणावमुक्त राहण्यासाठी त्यांनी योगा आणि मेडिटेशन केले पाहिजे.
  • इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून देखील दूर राहिले पाहिजे.
  • गरोदर महिलांनी त्यांच्या स्त्रीरोग तज्ञांच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि नियमितरित्या रक्तादाबाची तपासणी केली पाहिजे. महत्वाचे म्हणजे कोविड परिस्थितीत सोशल डिस्टन्स (SOCIAL DISTANCE), हातांची स्वच्छता, मास्क, योग्य आहार, योगा, मेडिटेशन आणि औषधांसह रक्तदाब नियंत्रण करण्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
    How to control high blood pressure during pregnancy: Do not consume sodium rich foods like pickles, frozen foods and canned soups. Pregnant women suffering from high blood pressure need to follow a good diet.

हे सुद्धा वाचा…चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी करा ‘या’ फळांचे सेवन.. – 

Beauty Tips : निखळ त्वचेसाठी करा आंबट फळांचे सेवन…

Social Media