नवी दिल्ली : अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल)ने बुधवारी सांगितले की, ते त्यांच्या रिन्यूएबल ऊर्जा पोर्टफोलियो मध्ये 4,954 मेगावॅट जोडण्यासाठी जपान च्या सॉफ्टबँक आणि भारताच्या भारती समुहाकडून एसबी एनर्जी इंडिया ताब्यात घेणार आहेत. हा भारताच्या रिन्यूएबल ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा करार आहे. हा करार सुमारे ३.५ अब्ज डॉलर एवढा आहे.
लक्ष्य पोर्टफोलियो मध्ये ८४ टक्के सौर क्षमता (४,१८० मेगावॅट), ९ टक्के वायू सौर हायब्रिड क्षमता (४५० मेगावॅट) आणि ७ टक्के वायू क्षमता (३२४ मेगावॅट)सह मोठ्या प्रमाणात उपयुक्त (utility) मालमत्ता समाविष्ट आहे. पोर्टफोलियो मध्ये १,४०० मेगावॅट सौर उर्जा क्षमता आणि एक आणखी ३,५५४ मेगावॅट ची सौर उर्जा क्षमता समाविष्ट आहे, ज्याचे कार्य सध्या सुरू आहे. सर्व प्रकल्पांमध्ये सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसईसीआय), एनटीपीसी लिमिटेड आणि एनएचपीसी लिमिटेड सारख्या सॉवरेन रेटेड (Sovereign rated) भागांसह २५ वर्षांच्या वीज खरेदी करारांचा समावेश आहे.
पोर्टफोलिओचा एक भाग बनणारी परिचालन मालमत्ता मुख्यतः सौर पार्क आधारित प्रकल्प आहे. या करारासह, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, २४.३ गीगावॅट (1) ची एकूण नूतनीकरण क्षमता आणि ४.९ गीगावॅट नूतनीकरणयोग्य क्षमता प्राप्त करेल.
या करारासह एसबी एनर्जी भारतीय बाजारातून बाहेर पडेल. उद्योग क्षेत्रातील सुत्रांच्या माहितीनुसार, एसबी एनर्जी यापुढे भारतातील कोणत्याही प्रकल्प योजनेत भाग घेणार नाही.
या संदर्भात अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवेदनात म्हटले आहे की, हे अधिग्रहन आमच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. ज्यामध्ये आम्ही २०१५ पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर कंपनी उभी करणे आणि त्यानंतर २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी रिन्यूएबल कंपनी उभारण्याची य़ोजना आखली होती. आम्ही घोषित केलेले लक्ष्य निश्चित केलेल्या मुदतीच्या चार वर्षे आधीच साध्य करू शकतो.
Indian Renewable Energy Sector’s biggest deal, Adani Green to buy this company. SB Energy will acquire India from Softbank of Japan and Bharti Group of India to add 4,954 MW to the renewable energy portfolio.
अदार पूनावाला यांनी लस बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला विकले संपूर्ण शेअर्स!
अदार पूनावाला यांनी लस बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला विकले संपूर्ण शेअर्स!